शहरं
Join us  
Trending Stories
1
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
2
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
3
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
5
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
6
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
7
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
8
स्मिता पाटील यांच्यासोबतच्या तुलनेवर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया, म्हणाली, "बाईला संघर्ष आजही..."
9
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
10
मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही राधिका आपटे? म्हणाली, "मला काही काळापासून..."
11
मुलाने कपाटातून आईचा महागडा नेकलेस चोरला, तोडून शाळेतील विद्यार्थिनींना वाटला, त्यानंतर...
12
IND vs SA T20I : संजूच्या जागी गिल का? सलामी संदर्भात कॅप्टन सूर्यानं स्पष्टीकरण दिलं, पण...
13
Jara Hatke: रात्री झोपताना एक पाय ब्लँकेटमधून बाहेर काढण्याची सवय आहे? मग 'हे' वाचाच!
14
IND vs SA: विराटची शतकं, रोहितची फटकेबाजी, संघाने मालिकाही जिंकली; पण आता आली वाईट बातमी
15
बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण
16
चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा
17
Crime: एकत्र दारु प्यायले, नंतर UPI पिन चोरला, मग...; २० लाखांच्या FD साठी मित्रांनीच रचला कट!
18
"माझ्या नवऱ्याने गर्लफ्रेंडसाठी मला..."; बायकोला जीवे मारण्याची धमकी, ढसाढसा रडत पोलिसांत धाव
19
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
20
हायस्पीड इंटरनेट! भारतात Starlink चे सब्सक्रिप्शन किती रुपयांना मिळेल? कंपनीने जाहीर केली किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तिघा दरोडेखोरांना आंबोलीत पकडले; हिंजवडी येथील ज्वेलर्सवर टाकला होता दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 22:58 IST

दोन बंदुकासह जिवंत काडतुसे सोन्या चांदीचे दागिने जप्त.

सावंतवाडी : पुणे हिंजवडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स वर दरोडा टाकून गोव्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या तीन दरोडेखोरांना आंबोली येथील पोलिस दुरक्षेत्रावर शनिवारी सायंकाळी पकडण्यात आले दुरक्षत्रावरील पोलिसांनी अचानक कार थांबल्यानंतर दरोडेखोरांकडून कारच दुरक्षेत्रावरील पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी जीवावर उदार होत या दरोडेखोरांना पकडले  त्याच्याकडून दोन बंदुकासह जिवंत काडतूसे सोन्या चांदीचा ऐवज जप्त केला आहे 

घटनेनंतर आरोपींना सावंतवाडीत आणण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी सावंतवाडीत दाखल झाले आहेत.शुक्रवारी सकाळी पिंपरी हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील सराफ दुकानात भरदिवसा पाच दरोडेखोरांकडून सशस्त्र दरोडा टाकला होता. दुकान मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली तसेच मिळतील ते दागिने घेऊन  पोबारा केला होता या घटनेची नोंद हिंजवडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्यानंतर पिंपरी चिंचवड तसेच हिंजवडी पोलिस आरोपीचा पाठलाग करत होते.या पाठलागा नंतर या दरोडेखोरांनी गोवा गाठण्याचे ठरवले त्या प्रमाणे शनिवारी गोव्याकडे जात असतना सायंकाळी आंबोली येथील पोलिस दुरक्षेत्रावर आले असता  आंबोली पोलीस दुरक्षेत्रावरील पोलिसांनी त्याची कार थांबवली त्यावेळी या दरोडेखोरांनी कार पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई आबा पिळणकर दिपक शिंदे अभिजीत कांबळे यांनी स्वताच्या जीवावर उदार होत या दरोडेखोरांना कार सह जागेवर अडवून धरत तेथेच त्यांना पकडले.

यात अल्ताफ बाबू खान (24) गोविंद भवरालाल दिवाणी (23) रातुराम कृष्णराम बिष्णोई (26) अशी तिघांची नावे आहेत.या सर्व आरोपींना सावंतवाडीत आणण्यात आले असून त्यांची कारसह झाडाझडती घेतली असता या झाडाझडतीत दोन बंदुका सह जिवंत काडतुसे सोन्या चांदीचे दागिने आढळून आले आले आहेत.

दरम्यान या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी सावंतवाडीत दाखल झाले असून आरोपीची कसून चौकशी करीत आहेत.अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSawantwadiसावंतवाडी