तीन खलाशांसह नौका बेपत्ता
By Admin | Updated: October 14, 2015 23:49 IST2015-10-14T23:49:14+5:302015-10-14T23:49:14+5:30
गवंडीवाडा : मालवण बंदरातून मंगळवारी गेली होती मासेमारीस

तीन खलाशांसह नौका बेपत्ता
मालवण : मालवण गवंडीवाडा येथून समुद्रात मंगळवारी मासेमारीला गेलेली गुरुकृपा नौका बेपत्ता झाली आहे. २४ तास उलटले तरी किनारी न परतल्याने नौका चालक गौरेश गणेश माळगावकर यांनी मत्स्य विभागाला माहिती दिली. याबाबत कोस्ट गार्ड व संबंधित यंत्रणांना मत्स्य विभागांना माहिती दिली असून उशिरापर्यंत नौकेचा पत्ता लागला नव्हता. या नौकेत बाळा टिकम, विजय चव्हाण, सानप्पा हे तीन खलाशी आहेत. दुपारी २० लिटर डिझेल क्षमता असलेल्या इंजिनची आयएनडी एमएच ५, एमएम २७६० ही सफेद निळ्या रंगाची नौका तीन खलाशांसह मासेमारीला निघाले. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास परतणारी नौका सायंकाळपर्यंत परतली नाही. त्यामुळे खलाशांकडे असलेल्या मोबाईलवर संपर्क झाला नाही. त्यामुळे गौरेश माळगावकर यांनी मत्स्य विभागास बोट बेपत्ता झाल्याची माहिती दिली आहे. ही बोट देवगड-नाडण येथील गणेश भांबल यांच्या मालकीची असून माळगावकर यांनी चालविण्यास घेतली होती.
काही महिन्यापूर्वी अशाच पद्धतीने मालवणातील एक नौका बेपत्ता झाली होती. तीन ते चार दिवसा नंतर भरकटत जावून रत्नागिरी बंदरात सापडून आली. सर्व खलाशीही सुखरूप होते. याही नौकेचे इंजिन खराब अथवा अन्य काही समस्या निर्माण झाली तर समुद्रात मासेमारीस गेलेल्या नौकांची मदत मिळू शकते. याबाबत मत्स्य विभाग व कोस्टगार्ड सह पोलिस यंत्रणा नौकेचा शोध घेत आहेत. चार दिवसापूर्वी समुद्रातील वादळ शांत झाले. त्यानंतर ही नौका मासेमारीस गेली होती. (प्रतिनिधी)