शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नीलिमा वालावलकर यांना धमकी, पोलिसांत तक्रार : भाजपाच्या चार कार्यकर्त्यांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 16:13 IST

Bjp, Shiv Sena, Election, sindhudurg, Police भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कुडाळ पंचायत समितीच्या सदस्या नीलिमा वालावलकर यांनी भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी आल्याची लेखी तक्रार कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.

ठळक मुद्देनीलिमा वालावलकर यांना धमकी, पोलिसांत तक्रार भाजपाच्या चार कार्यकर्त्यांची नावे

कुडाळ : भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कुडाळ पंचायत समितीच्या सदस्या नीलिमा वालावलकर यांनी भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी आल्याची लेखी तक्रार कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची याबाबत वालावलकर यांनी भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, युवा सेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर उपस्थित होते. या लेखी तक्रारीत वालावलकर यांनी नमूद केले की, त्या पिंगुळी काळेपाणी येथे पती व दोन मुलांसहीत राहतात. पिंगुळी पंचायत समिती सदस्यपदी त्या स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या. ३१ ऑक्टोबरला कुडाळमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.त्याच रात्री १० वाजता कुटुंबासह घरी असताना भाजपाचे रणजित देसाई, विनायक राणे, अजय आकेरकर, सतीश माड्ये हे चार कार्यकर्ते गाडी घेऊन घरी आले. त्यांनी धमकावले की, तुम्ही शिवसेनेत प्रवेश का केला? आम्ही तुमच्या निवडणुकीत जो खर्च केला तो आम्हांला परत करा. तुम्हांला आमदार नीतेश राणे काय आहेत हे माहीत आहे ना? ते काय करू शकतात? तुमच्या पतीला व मुलांना मारहाण करू शकतात. तुम्हाला समजणारही नाही असे सांगितले अशा धमक्या दिल्याचे नमूद केले.मी शिवसेनेत कोणाच्याही दबावाखाली प्रवेश केला नाही. केवळ पिंगुळीवासीयांच्या विकासासाठी केला. निवडणूक स्वतःच्या खर्चाने लढवली. मी कुणाकडून व पक्षाकडून पैसे घेतले नाही. माझी व्हॉट्सॲपद्वारे नाहक बदनामी करण्यात येत आहे. माझे कुटुंब व मी गेले दोन दिवस दडपणाखाली असून आमच्या कुटुंबाला मारहाण झाली तर याला हे चार जण जबाबदार राहतील असे अर्जात नमूद करण्यात आले. भविष्यात मला व कुटुंबाला कुठलाही धोका होणार नाही. अनुचित प्रकार घडणार नाही अशा प्रकारचा जबाब त्यांच्याकडून घ्यावा. मला व कुटुंबाला न्याय मिळावा. महिला म्हणून सहानुभूती मिळावी, अशी मागणी त्यांनी लेखी तक्रार अर्जातून केली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस