शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

यंदा सहा वर्षांची मुले पहिलीत दाखल होणार

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 17, 2024 15:05 IST

प्रवेश देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर

सिंधुदुर्ग : शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण अनिवार्य केले आहे. विद्यार्थ्यांवर अधिक तपाण येऊ नये, यासाठी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सहा वर्षे पूर्ण होणारी बालके यंदा इयत्ता पहिलीत दाखल करण्यात येणार आहेत. सहा वर्षे पूर्ण असणार्या अशा बालकांना सक्तीपात्र तथा दाखलपात्र म्हणून समजण्यात येणार आहे.आरटीईनुसार शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे.विद्यार्थ्यांनी कमी वयात शाळेत प्रवेश केल्यास त्यांच्यावर अभ्यासाचा अधिक ताण येत असून मुलांचा शैक्षणिक, सर्वांगीण विकास होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहतात. त्यामुळे केंद्र सरकारने शैक्षणिक सत्र २०२४ २५ या वर्षासाठी इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे पूर्ण होणे अपेक्षित आहे.

प्रवेशाचे वय आणि वर्गवर्ग                       वयनर्सरी                  ३ वर्षे पूर्णज्युनिअर केजी    ४ वर्षे पूर्णसिनिअर केजी    ५ वर्षे पूर्णइयत्ता पहिली     ६ वर्षे पूर्ण

नोकरीत लवकर संधीआता खासगी असो की शासकीय शाळांत सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाच पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे पूर्ण नाही, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. कमी वयात पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीत संधी लवकर मिळते. तसेच नोकरीचा कालावधीही जास्त मिळतो.

नर्सरीत कधी प्रवेश

  • कमी वयात शाळेत मिळणार्या प्रवेशाला आता चाप बसणार आहे. मूल अडीच वर्षांचे झाल्यास लगेच पालकांना नर्सरी वर्गासाठी शाळेचे वेध लागतात.
  • त्यानुसार खासगी, तसेच शासकीय शाळेत मुलांना प्रवेश दिला जात असे. मात्र, आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत तीन वर्षे पूर्ण होणार्या मुलांना नर्सरी वर्गासाठी शाळेत प्रवेश मिळणार आहे.

कोणत्या मुलांचा समावेशया पार्श्वभूमीवर आता आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देताना सर्व शाळांना १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ या काळात जन्मलेल्या मुलांनाच इयत्ता पहिलीत प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडू् सांगण्यात आले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गStudentविद्यार्थीSchoolशाळा