शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

By सुधीर राणे | Updated: May 2, 2023 15:27 IST

सभेत नेहमीप्रमाणेच आगपाखड, टोमणे, मत्सर पहायला मिळाला

कणकवली: महाविकास आघाडीची मुंबई येथे झालेली वज्रमूठ सभा म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचे आव्हान परतवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. तसेच भावनिक वातावरण तयार करून सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन मते मिळविण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असल्याची टीका विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.प्रवीण दरेकर म्हणाले, या सभेत नेहमीप्रमाणेच आगपाखड, टोमणे, मत्सर पहायला मिळाला. या सभेत काही मुद्यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला.पण त्याबाबतची वस्तूस्थितीही पाहणे आवश्यक आहे. मुंबई वेगळी करून महाराष्ट्राचा लचका तोडायचा प्रयत्न केला जात आहे असे वक्तव्य करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सांगितले आहे की, भावनिक वातावरण तयार करून मते मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  यापूर्वीच जाहीर इशारा दिला आहे की, मुंबई  महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्याही बापात नाही. तसे कोणी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला माफ केले जाणार नाही. पण, काहीही वक्तव्ये करून उद्धव ठाकरे यांचा सहानुभूतीच्या लाटेवर स्वार व्हायचा प्रयत्न आहे. तो यशस्वी होणार नाही. मुंबईतील ठेवी जशा त्यांच्या बापाच्या नाहीत, तशाच त्या आमच्या बापाच्याही नाहीत. त्या मुंबईकरांच्या ठेवी असून त्यांना सुविधा पुरविण्यासाठीच महापालिकेच्या माध्यमातून त्याचा वापर व्हायला हवा. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शालेय अभ्यासक्रमात श्रीमंत कसे व्हायचे याबाबत अदानींच्या आत्मचरित्राचा धडा असायला हवा, असे सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे यांचा स्वतःचा काहीही उद्योग नसताना एका मातोश्रीच्या दोन इमारती कशा झाल्या. याबाबत त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून लेख प्रसिद्ध करावा. म्हणजे झेंडा नाचवणाऱ्या शिवसैनिकांना श्रीमंत कसे व्हायचे? हे समजेल. सध्याचे राज्यातील सरकार भक्कम आहे. त्याला कोणताही धोका नाही.हे विकासाभिमुख सरकार आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांना साक्षात्कार झाला आहे ,की हे सरकार पडणार आहे. त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. राज्य सरकार मध्ये चांगला समन्वय आहे. महाविकास आघाडीत तो नाही. राज्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.कोकणचा विकास व्हायचा असेल तर पर्यावरणाची हानी होणार नाही,असे प्रकल्प येथे यायला हवेत.त्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल.बारसूच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका आहे. त्याबाबत त्यानी जनतेसमोर आधी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री असताना कोकणच्या विकासासाठी काय केले?बारसू येथे येणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री असताना कोकणच्या विकासासाठी काय केले?ते जाहीरपणे जनतेला सांगावे. आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडावा.असेही प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.शरद पवारांना अनेक गोष्टी पचनी पडत नाहीत!शरद पवार हे एक जाणते नेते आहेत. विकासासाठी असलेली त्यांची तळमळ नेहमीच दिसून येते. त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. समाजातील अनेक गोष्टी त्यांच्या पचनी पडत नाहीत. मात्र, कालांतराने त्यातील एक एक गोष्ट पुढे येतील.असेही प्रवीण दरेकर भाजप-राष्ट्रवादी यांच्या राज्यातील सरकारबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpravin darekarप्रवीण दरेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरे