शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यातील 'या' गावात  ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार, राज्य सरकारने केंद्राला दिले संमती पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 17:29 IST

केंद्र सरकार राज्यात राबवत असलेले प्रकल्प येत्या दोन, तीन वर्षात पूर्ण केले जाणार

कणकवली : राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार आहे. राज्य सरकारने  त्याबाबत संमती दर्शविणारे पत्र केंद्र सरकारला दिले आहे. अशी माहिती भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे. कणकवली येथिल भाजप कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली पंचायत समिती उपसभापती मिलींद मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये, नगरसेवक शिशिर परुळेकर, कार्यालय प्रमुख समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.प्रमोद जठार म्हणाले,  बारसू, गोवळ येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प केला जाणार आहे. केंद्र सरकारला राज्य सरकारने तशी संमती दिली आहे. याबाबत आम्ही  केंद्रीय मंत्र्यांची विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत जाऊन लवकरच भेट घेणार आहोत. केंद्र सरकार राज्यात राबवत असलेले प्रकल्प येत्या दोन, तीन वर्षात पूर्ण केले जाणार आहेत. केंद्र सरकार त्यावर काम करत आहे. 

कोकणात जे काम खासदार विनायक राऊत यांनी केले पाहिजे होते ते करू शकले नाहीत. मात्र, भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यामुळे कोकणात फार मोठया प्रमाणात विकास कामे होत आहेत. राणेंमुळे कोकणात जसा भाजपा शतप्रतिशत झाला तसा विकासही शतप्रतिशत होणार आहे. मोदी सरकारच्या कामाचा भाजपने पाठपुरावा केला आणि मुंबई ही आर्थिक राजधानी व गोवा ही पर्यटन राजधानी अशी मोठी शहरे महामार्गाने जोडली. देवगड आनंदवाडी प्रकल्पाचे काम सुरू आहे. कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे प्रकल्प उभारून विजयदुर्ग बंदर रेल्वेने जोडले जाईल. त्याचा पाठपुरावा यापुढे आम्ही करणार आहोत असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGreen Planetग्रीन प्लॅनेट