शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत पाणी कपात नाही : बबन साळगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:28 IST

पाळणेकोंड धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, पाऊस उशिरा असला तरी पुढील ४५ दिवस शहरवासीयांना कोणतीही भीती नाही, तसेच पाणी कपात होणार नसल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.

ठळक मुद्दे४५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा, मात्र नासाडी न करण्याचे आवाहनसावंतवाडीत पाणी कपात नाही : बबन साळगावकर

सावंतवाडी : पाळणेकोंड धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, पाऊस उशिरा असला तरी पुढील ४५ दिवस शहरवासीयांना कोणतीही भीती नाही, तसेच पाणी कपात होणार नसल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.

पाळणेकोंड धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातोच तसेच आजूबाजूच्या तीन गावांना ही नगरपालिका पाणी पुरवठा करत असते. ते पाणी पालिका कपात करणार नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.सावंतवाडी शहर पाण्याने स्वयंपूर्ण आहे. शहराला पाळणे कोंड धरण तसेच केसरी येथील नळपाणी योजनेतून पाणी पुरवठा होत असतो. दरवर्षो पाणीसाठा कमी असायचा पण यावेळी पुरेसा पाणी साठा असल्याने शहरावर पाणी कपातीचे कोणतेही संकट येणार नाही. पाळणेकोंड धरणा त पुढील ४५ दिवस पुरेल एवढा पाणी सध्या शिल्लक आहे.पाउस लांबणीवर पडल्याने शहरावर पाणी संकट येईल का?यांची उत्सुकता सगळ्याना होती पण तसे कोण ते ही संकट येणार नाही.सावंतवाडी शहराला दरदिवशी १० लाख लीटर एवढे पाणी लागते तर सावंतवाडी नगरपालिका कोलगावला दरदिवशी २ लाख लीटर माजगावला ५० हजार लीटर तर चराठा ६२ हजार लीटर आणि कुणकेरी गावाला १ लाख १४ हजार लिटरचा पाणी पुरवठा करत असते. मात्र गेले काही वर्षे पाऊस लांबला म्हणून पाणी कपात करणे पालिकेला भाग पडले.पण यावर्षी पाऊस लांबणार असे वाटत असतानाही पालिकेने कोणती पाणी कपात करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळेल यात कोणतीही शंका नाही. मात्र पाणी मिळते म्हणून जास्त पाण्याचा वापर करू नका. गरज असेल तेवढेच पाणी वापरा, असे आवाहनही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.सावंतवाडी शहरातील २५ घरे ही उंचावर असल्याने तेथे पाणी चढत नाही. पण या घरासाठीही भविष्यात योजना आणणार असून उंचावर टाक्या बसवणार आहे.नवीन नळपाणी योजनेचा आराखडा ही तयार करण्यात आल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभागी सुकी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग