शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

तहसीलदारांच्या कारवाईत पारदर्शकता नाही, मंदार केणी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 16:10 IST

महसूलकडून हप्तेबाजीसाठी कारवाईचे नाटक केले जात आहे. तहसीलदार करत असलेल्या कारवाईत पारदर्शकता नाही. वाळू व्यावसायिकांना वेठीस धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा धक्कादायक आरोप करताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी हडीत वाळू व्यावसायिकांकडून तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्दे तहसीलदारांच्या कारवाईत पारदर्शकता नाही, मंदार केणी यांचा आरोपमहसूलकडून हप्तेबाजीसाठी कारवाईचे नाटक

मालवण : महसूलकडून हप्तेबाजीसाठी कारवाईचे नाटक केले जात आहे. तहसीलदार करत असलेल्या कारवाईत पारदर्शकता नाही. वाळू व्यावसायिकांना वेठीस धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा धक्कादायक आरोप करताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी हडीत वाळू व्यावसायिकांकडून तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा दावा केला आहे.दरम्यान, तहसीलदार खोट्या केसीस दाखल करून वाळू व्यावसायिकांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. हप्ते देणाऱ्यांवर कारवाई होत नाही. कमी हप्ते देणाऱ्यांवर कारवाईसाठी ठराविकच कर्मचारी घेऊन तहसीलदार पोहचत आहेत. तथाकथित घटना बनाव असल्याचे केणी यांनी सांगितले.स्वाभिमान तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केणी बोलत होते. यावेळी स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेवक यतीन खोत, बाबा परब, विक्रांत नाईक, राजन सारंग, राजन चव्हाण, बाबू तोरसकर, प्रशांत मिठबावकर, विकी मालवणकर, शिवदास चव्हाण, विराज तळाशिलकर, पराग नार्वेकर, गुरूनाथ चव्हाण, सचिन आंबेरकर तसेच इतर वाळू व्यावसायिक उपस्थित होते.वाळू लिलाव प्रक्रिया जाणीवपूर्वक रखडवली जात आहे. वाळू व्यावसायिक यामुळे पूर्णपणे कर्जबाजारी होवून अडचणीत सापडलेले आहेत. वाळू उपसा करण्यासाठी कामगार आणून त्यांना पगार दिला जात आहे. मात्र काम सुरू झालेले नसल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. याला सर्वस्वी सत्ताधारी आणि प्रशासन दोघेही जबाबदार आहेत. येत्या दहा दिवसात वाळु टेंडर उघडली नाहीत, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही केणी, खोत यांनी दिला.तहसीलदारांची सखोल चौकशी व्हावी!तहसीलदार समीर घारे यांनी धडक कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त का नेला नाही? एका पाटीर्तून कारवाई करण्याचा प्लॅन झाला आणि महसूलचे पथक पोहचले. त्यामुळे महसुलची पार्टी कशासाठी होती? आणि कोणी आयोजित केली होती? तसेच कारवाईत घटनास्थळी नेमके काय झाले? याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. याचीही मागणी वरिष्ठ स्तरावर करणार असल्याचे मंदार केणी यांनी सांगितले.

टॅग्स :Malvan police stationमालवण पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग