लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींकडून अपेक्षित प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 01:02 PM2021-01-30T13:02:54+5:302021-01-30T13:03:41+5:30

Corona vaccine Sindhudurg- कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यावर दुष्परिणाम होतील, या भीतीमुळे ही लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. परंतु अद्याप कोणतेही दुष्परिणाम लस घेतलेल्या व्यक्तींना आढळून आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपले नाव आल्यावर पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यानी केले आहे.

There is no expected response from people registered for the vaccine | लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींकडून अपेक्षित प्रतिसाद नाही

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी कोरोना लस घेतली.

Next
ठळक मुद्देलस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींकडून अपेक्षित प्रतिसाद नाही

ओरोस : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यावर दुष्परिणाम होतील, या भीतीमुळे ही लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. परंतु अद्याप कोणतेही दुष्परिणाम लस घेतलेल्या व्यक्तींना आढळून आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपले नाव आल्यावर पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यानी केले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यानी २० जानेवारी रोजी दुपारी स्वतः कोरोना लस घेतली. त्यानंतर त्यांना कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. यानंतर त्यांनी शासनाने लस घेण्यास परवानगी दिलेल्या शासकीय अधिकारी-कर्मचारी या कोरोना योद्ध्यांना लस घेण्याबाबत आवाहन केले आहे.

यावेळी त्यांनी, कोविड व्हॅक्सिनबाबत नागरिकांना भीती वाटत आहे. परंतु या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. किरकोळ दुष्परिणाम जाणवल्यास त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यासाठी यंत्रणा, सामग्री व औषधे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणतीही भीती नाही, असे सांगितले.

ही कोरोना लस एक अनमोल रत्न आहे. परदेशात यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. आपल्याला शासनाने मोफत ही लस उपलब्ध करून दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने वारंवार सुरक्षिततेबाबत सांगूनसुद्धा जिल्ह्यातील कोविड लसीकरण टक्केवारी वाढताना दिसत नाही, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

लोक आपला मोबाईल बंद ठेवतात

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी ह्यकाही मंडळी दोन-तीनवेळा फोन करून तो उचलत नाहीत. वारंवार सांगूनसुद्धा मोबाईल बंद ठेवतात. मी जिल्हा शल्यचिकित्सक या पदावर कार्यरत आहे. माझे नाव आल्यावर मी ही लस घेतली आहे. मला कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे,ह्ण असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.
 

Web Title: There is no expected response from people registered for the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.