शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

मी नाराज नाही, कोकणची सेवा करण्याची इच्छा - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:58 IST

सावंतवाडी : माझ्या मंत्रिपदाच्या काळात सर्वांनाच न्याय दिला. मी केलेल्या कामाचे मला पूर्ण समाधान वाटते. मी नाराज नाही, उलट ...

सावंतवाडी : माझ्या मंत्रिपदाच्या काळात सर्वांनाच न्याय दिला. मी केलेल्या कामाचे मला पूर्ण समाधान वाटते. मी नाराज नाही, उलट सर्वानाच विश्वासात घेऊन आणखी चांगले काम करून दाखवेन, असा विश्वास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. मला कोकणची सेवा करण्याची इच्छा असून, निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात तशी तयारी दर्शवली होती, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मंत्रिमंडळ विस्तारात केसरकर यांचे नाव नव्हते. केसरकर मुंबईहून शिर्डीला निघाले. त्यावेळी भ्रमणध्वनीवरून पत्रकारांशी संवाद साधला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी त्यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले.केसरकर म्हणाले, मी दोनवेळा मंत्री म्हणून काम केले आहे. कोकण विभाग हा दुर्लक्षित राहिला आहे. मुंबईच्या जवळचे भाग विकसित झाले. मात्र, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर याकडे अधिकच लक्ष देणे आवश्यक होते. त्यामुळे या विभागाची अधिकची सेवा घडावी, अशी साईंची इच्छा असेल म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तसा निर्णय घेतला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संघर्ष करणारे नेते आहेत. चांगल्या योजना त्यांनी राज्यात राबविल्या. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. माझ्यावर अन्य कोणती जबाबदारी दिली जाणार आहे का ? याची कल्पना नाही. आमदारांची भेट घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकदाच भेट झाली. त्यानंतर अद्याप भेट झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षणविभागात मी क्रांतीकारी निर्णय घेतले. पुढील मंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. मराठी भाषा विभागातही उल्लेखनीय कार्य केले. मी केलेल्या कामाचे समाधान आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. उद्या नागपूरला जाणार असून नवनिर्वाचित मंत्र्यांचे अभिनंदन केल्याचे त्यांनी सांगितले. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश महायुतीला मिळू दे, असे साकड साईचरणी घातले असल्याचे त्यांनी सांगितले.कोकणची सेवा करणारजिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. भविष्यात सर्वांगीण विकास झाल्यावर ते आणखीन वाढेल व पहिल्या क्रमांकावर येऊ शकेल. साईबाबांची तशी इच्छा असेल अन् ते माझ्या हातून घडेल. मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDeepak Kesarkarदीपक केसरकर ministerमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे