शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत अद्यापही गूढ कायम; लोकसभेसाठी नारायण राणे, किरण सामंत यांची नावे चर्चेत

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 14, 2024 14:15 IST

किरण सामंत यांच्याकडून प्रचार सुरू

सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील एकुण ४८ जागांपैकी भाजपाच्या वाट्याच्या जागा आणि मागच्या वेळी त्यांचे विद्यमान खासदार विजयी झालेले होते त्या जागांवर दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. यामध्ये भाजपाने पाच विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. मात्र, बहुचर्चित रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत अद्यापपर्यंत कोणतीही घोषणा केलेली नाही. यामुळे या जागेबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग लाेकसभा मतदार संघावर शिवसेना शिंदे गटाचे किरण उर्फ भैय्या सामंत यांनी उमेदवारी मिळते ? की भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देते ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपाने लोकसभेच्या एकुण ५४३ जागांपैकी दुसरी यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील भाजपाच्या २० विद्यमान खासदारांच्या जागेवर हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या २० जागांपैकी पाच जागांवर भारतीय जनता पार्टीने विद्यमान पाच खासदारांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा विद्यमान खासदारांना धक्काच मानला जात आहे.

भाजपचाच उमेदवारसंपूर्ण कोकणसह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या तळकोकणातील जागेवर भारतीय जनता पार्टी उमेदवार जाहीर करेल अशी आशा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाटत होती. या ठिकाणी विद्यमान केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंचे नाव चर्चेत आहे. परंतु वेगवेगळ्या तर्कविर्तकानुसार या जागेचे गुढ कायम असल्याचे दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार या जागेवर लढणार असे गोव्याचे मुख्यमंत्री यांनी सावंतवाडीतील भाजपाच्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. त्यामुळे आता ही जागा केव्हा जाहीर होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

किरण सामंत यांच्याकडून प्रचार सुरूशिवसेनेकडून येथे शिवसेनेचाच उमदेवार असेल आणि किरण सामंत या ठिकाणी लढतील असे स्पष्ट केल्यानंतर निश्चितच सामंत यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. मात्र किरण सामंत हे सध्या महायुतीचाच उमेदवार असेल आणि तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जात त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे. तर कार्यकर्त्यांसाठी रत्नागिरीतून खास प्रचारासाठी विशेष गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. यामध्ये शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे किरण सामंत हे लढणार असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlok sabhaलोकसभाNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना