शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला, महावितरणचे कर्मचारी डागडुजीच्या कामात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:30 IST

सूर्यनारायणाचे दर्शन घडून आले

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी आहे. रविवारी सकाळच्या सत्रात काही भागात मोठ्या सरी कोसळल्या तर दुपारनंतर काही भागात सूर्यनारायणाचे दर्शन झाले. सायंकाळी पावसाने थोडी उघडीप दिली होती. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत १५.९ च्या सरासरीने १२७ मिलिमीटर पाऊस पडला आहे.गेले पाच दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदी-नाले प्रवाहित झाले असून चढणीचे मासे ही दिसत आहेत. मासे मारण्यासाठी शेतजमिनीमध्ये नागरिकांची धावपळ जिल्ह्यात दिसून येत आहे. गेले पाच दिवस झोडपून काढलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. सकाळच्या सत्रात जिल्ह्यात काही भागात मोठ्या सरी कोसळल्या. दुपारनंतर काही भागात पाच दिवसांनंतर सूर्यनारायणाचे दर्शन घडून आले.दरम्यान, दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर, वसोली, आंजिवडे, दुकानवाड, साकिर्डे अशा गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता. रविवारी दुकानवाड येथील  जुना पूल पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.

वीज यंत्रणा बाधित

  • बाधित उपकेंद्रे -१०.
  • बाधित उच्चदाब वाहिन्या -२९.
  • पडलेले लघुदाब खांब - ७२.
  • पडलेले उच्चदाब खांब -२७
  • बाधित रोहित्रे - २,४१८.

अपडेट्स मिळवा मोबाइलवरमोबाइल क्रमांक नोंदणी केलेल्या ग्राहकांना खंडित वीजपुरवठा, वीजबिल व इतर माहिती एसएमएसवर पाठविली जाते. त्यासाठी ग्राहकांनी स्वत:चा मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदविणे आवश्यक आहे. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.

४३२ गावे प्रभावित२,२४१३३ ग्राहक प्रभावित झाले आहेत. काही गावात पर्यायी यंत्रणा वापरून वीज सुरू केली आहे. ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरू करण्याकरता महावितरण कर्मचारी व अधिकारी अथक परिश्रम घेत, अहोरात्र काम करीत आहेत.

आपत्कालीन संपर्कजिल्ह्यातील वीज ग्राहक आपत्कालीन कक्षाच्या ७८७५७६५०१९ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ग्राहक सेवेत हा क्रमांक चोवीस तास सुरू असणार आहे. अशी माहिती  महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस