शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

...तर आमदारकी सोडून वैभव नाईक नगरपंचायत निवडणूक लढवतील!; समीर नलावडे, बंडू हर्णे यांचा पलटवार 

By सुधीर राणे | Updated: May 5, 2023 16:39 IST

कणकवली : कणकवली येथील जुन्या भाजी मार्केट जवळील सुलभ शौचालयाची नवीन इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकानुसारच बनवण्यात येत आहे. ...

कणकवली: कणकवली येथील जुन्या भाजी मार्केट जवळील सुलभ शौचालयाची नवीन इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकानुसारच बनवण्यात येत आहे. त्या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने  खर्च वाढला आहे. मात्र, कणकवलीत चांगली विकासकामे आम्ही केल्यामुळेच विरोधकांना आता पोटशूळ उठला असल्याचे  प्रत्युत्तर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिले आहे. तसेच विकासकामात एवढे पैसे मिळत असतील तर आमदारकी सोडून वैभव नाईक कणकवलीत नगरपंचायत निवडणूक लढतील,असा टोलाही समीर नलावडे यांनी यावेळी लगावला. कणकवली खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक संजय कामतेकर, विराज भोसले, अभिजीत मुसळे, अजय गांगण आदी उपस्थित होते.बंडू हर्णे म्हणाले, कणकवली नगरपंचायतच्या कामांवर विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. कणकवलीत सुलभ शौचालय बांधण्याचे काम केले जात आहे.त्याबाबत जनतेला वस्तुस्थिती समजली पाहिजे.म्हणूनच आम्ही त्याबाबतची माहिती देत आहोत. गेली पाच वर्ष सुशांत नाईक,कन्हैया पारकर  विरोधी पक्ष म्हणून काम करत आहेत.राज्यात त्यांची  सत्ता असताना ते काहीही बोलू शकलेले नाहीत.आमच्या कामाची दखल घेवून राज्यात कणकवली नगरपंचायतला एक नंबर देण्यात आला आहे.त्याबद्दल विरोधकांना पोटशूळ उटल्याने ,ते जनतेची दिशाभूल करण्यासाठी बेताल आरोप करत असल्याचे बंडू हर्णे यावेळी म्हणाले. सुलभ शौचालय बांधकामाचा जीएसटी व अन्य कर वगळता अंदाजपत्रक ६९ लाख ९३ हजार आहे.संपूर्ण बांधकाम ८०२ स्क्वेअर फूटचे आहे. वरचा मजला ५७५ स्क्वेअर फूट असून त्यात पत्रा शेड आणि किचन आहे. तळमजल्यावर पुरुष, स्त्रियांसाठी वेगवेगळी स्वछता गृहे, मोठी आरसीसी वॉटर प्रुप सेफ्टी टॅंक, सेफ्टी वॉल यासारखी कामे होतील. त्यामुळे तळ मजल्याचे सिव्हील वर्क मध्ये ३६८३ रुपये दराप्रमाणे काम होणार आहे. स्वच्छता गृह तसेच अपंगांसाठी वेगळी व्यवस्था आहे. या शौचालयाचे काम अत्यंत अद्ययावत पद्धतीने केले जाणार आहे असे बंडू हर्णे म्हणाले.समीर नलावडे म्हणाले, शिवसेनेचे खासदार आणि आमदार कार्यरत आहेत, जर ते चुकीचे काम असेल तर खरोखर चौकशी लावावी. आम्ही तयार आहोत. जनतेसमोर खोटे बोलायचे, मात्र, रेटून बोलायचे अशी सवय सुशांत नाईक आणि कन्हैया पारकर यांची आहे. देवाकडे प्रार्थना करूनही ते सत्तेवर येणार नसल्याने आरोप करून आमची बदनामी करण्याचा हा विरोधकांचा खटाटोप आहे.विरोधी पक्ष म्हणून आरोप करण्याची त्यांची जबाबदारी होती. ती ते पार पाडत आहेत. आता ५ वर्ष झाल्याने सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत. कणकवली नगरपंचायतमध्ये एवढे पैसे जर मिळत असतील तर वैभव नाईक आमदारकी सोडून कणकवलीत निवडणुकीला उभे राहतील. यापुर्वी शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार आणि आमदारानी रेल्वे स्टेशनजवळ उद्यान करणार असा शब्द दिला होता.पारकर आणि नाईक यांनी एस टी स्टँड विकसित करून भाजीवाल्याना गाळे देणार असे जाहीर केले होते. त्याचे काय झाले? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणावेळी वैभव नाईक, पारकर यांनी विरोध केला होता. आमच्या ताकदीवर त्याचे स्थलांतरण आम्ही करुन दाखवले. आता ते मोर्चाची भाषा करत आहेत. त्यांनी यावे आम्ही तयार आहोत.सनराईज टॉवर मध्ये जागेसाठी सुशांत नाईक यांच्याकडे अनेकानी लाखो रुपये गुंतवले आहेत. त्या गाळ्यांची 'ओसी' होत नाही. त्या विरोधात मी लवकरच आंदोलन छेडणार आहे.नाईक यांनी लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोप समीर नलावडे यांनी यावेळी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीVaibhav Naikवैभव नाईक