संदीप बोडवेमालवण (जि. सिंधुदुर्ग) : वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी (डब्ल्यूसीएस) म्हणजे म्हणजे वन्यजीव संरक्षणातील भारताच्या मरिन टीमने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ४२६ समुद्री मैलांहून अधिक विस्तृत क्षेत्रात लाइन-ट्रान्सेक्ट पद्धतीचा वापर करून सर्वेक्षण केले.या प्राथमिक सर्वेक्षणात अनेक विलक्षण सागरी प्रजाती नोंदविण्यात आल्या. कांदळवन विभाग आणि कांदळवन फाउंडेशनच्या सहकार्यातून सुरू असलेल्या या अभ्यासातून महाराष्ट्राच्या समुद्रातील सागरी प्रजाती आणि चालणाऱ्या मासेमारीबाबतची शास्त्रीय माहिती उजेडात येणार आहे.सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या प्रजातीइंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइसेस, इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिन, पेलेजिक सीबर्ड्स - मास्कड बूबी, स्विनहोचे स्टॉर्म पेट्रेल, आर्क्टिक स्कुआ, समुद्री कासवे व इतर समुद्री वन्यजीवांसह आकर्षक माहिती नोंदण्यात आली.लाइन-ट्रान्सेक्ट पद्धती म्हणजे काय?लाईन ट्रान्सेक्ट पद्धत ही समुद्रातील सागरी सस्तन प्राण्यांची संख्या मोजण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी शास्त्रीय पद्धत आहे. वैज्ञानिक समुद्रात बोटचा वापर करून सरळ रेषा (ज्यांना ट्रान्सेक्ट्स म्हणतात) अनुसरतात. या रेषा आधीच नकाशावर आखल्या जातात. बोट या रेषांवरून जात असताना, वैज्ञानिक बोटीच्या दोन्ही बाजूंना सागरी सस्तन प्राण्यांचा शोध घेतात.सर्वेक्षणादरम्यान काय केले जाते?सागरी सस्तन प्राणी दिसल्यास, वैज्ञानिक त्याचे स्थान, प्रजाती, गटाचा आकार आणि बोटीपासूनचे अंतर नोंदवतात. अंतर मोजण्यासाठी विशेष उपकरणे जसे की दुर्बिण किंवा रेंज फाइंडर वापरतात.संशोधक टीम : डॉ. अनंत पांडे, प्रदीप नामदेव चोगले, अभिषेक मेदि, हर्षदा साबळे, श्रीपाद गोयंका, जयेश विश्वकर्मा, श्रावणी कदम
सध्या आपल्याकडे सागरी सस्तन प्राणी आणि इतर समुद्री मेगाफाऊना याबद्दल अत्यंत अल्प माहिती उपलब्ध आहे. या गोष्टीला आणखी व्यापक स्वरूपात समजून घेण्यासाठी ही शोधमोहीम आखली होती. तसेच यातून व्यापक प्रमाणात चालणाऱ्या सागरी मासेमारीला देखील समजून घेण्यात मदत होईल आणि तिला आणखी बळकटी देता येईल. - डॉ. अनंत पांडे, मुख्य संशोधक मरिन टीम, डब्ल्यूसीएस.