संदीप बोडवेमालवण : मालवण, वेंगुर्ला परिसरातील सागरी पर्यटनाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठी पर्यटनातील नाविन्यपूर्ण संकल्पना, त्याच्या जोडीला कौशल्य विकास आणि दर्जेदार संसाधनांची आवश्यकता होती. यासाठी अभ्यासकांनी प्रयत्न केले. याचाच भाग म्हणून तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण सेंटर उभे राहिले, सुसज्ज डाईव्ह बोट आणण्यात आली. अंडरवॉटर पर्यटनासाठी निवृत्त युद्धनौका आयएनएस विराट येथील समुद्रात स्थापित केल्या नंतर सिंधुदुर्गचे जागतिक दर्जाच्या पर्यटनाचे विराट स्वप्न पूर्णत्वास जाणार होते. तब्बल सहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आता गुलदार आणि पाणबुडी च्या रूपाने हे स्वप्न साकार होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भारतीय नौसेनेमधील एखादी निवृत्त युद्धनौका समुदाच्या तळाशी स्थापित करत त्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणारा देशातील पहिला पर्यटन प्रकल्प आहे. जल प्रदूषणाला कारणीभूत असणारे घटक काढून टाकल्या नंतरच ही युद्धनौका निवती रॉक परिसरात समुद्राच्या तळाशी आर्टिफिशल रिप आणि अंडरवॉटर म्युझियम साठी स्थापित केली जाणार आहे. पाणबुडीच्या अथवा आधुनिक स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून या नौकेवर येणारे कोरल, रंगीबेरंगी मासे असं समुद्राच्या तळाशी असलेले नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता येणार आहे. देशातील पहिला प्रकल्प.. भारतीय नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचा अशा प्रकारे पुनर्वापर करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, निवृत्त जहाजांना कृत्रिम खडकांमध्ये रूपांतरित करून सागरी पर्यावरण संवर्धनास मदत करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते. हा पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उपाय मानला जातो, जो स्थानिक पर्यटन आणि सागरी जैवविविधतेला चालना देतोनौदल दिनी केली होती मागणी..तारकर्ली येथे संपन्न झालेल्या नौदल दिनाच्या दरम्यान एखादी निवृत्त युद्धनौका पर्यटनांतर्गत आर्टिफिशल रिफ अँड अंडरवॉटर म्युझियम साठी एमटीडीसीला मिळावी अशी मागणी नौदलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांजवळ करण्यात आली होती. याचेच फलित म्हणून नौदलाच्या अधिकाऱ्यांनीही याला हिरवा कंदील दाखवला आणि नंतर भारत सरकारनेही ऐतिहासिक पाऊल उचलत, निधीची तरतूद करून भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज आयएनएस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) कडे सुपूर्द केले. मालवणच्या टीमकडे देखरेख..एमटीडीसी चे कोकण विभागीय प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांच्या कडे प्रकल्प समन्वयक म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक बोट क्लबचे व्यवस्थापक धीरज चोपडेकर, इसादाचे व्यवस्थापक सूरज भोसले आणि त्यांचे सहकारी संकेत गावडे, जितेश वस्त, थॉम्सन फर्नांडीस आदींची टीम देखरेख करत आहे.
Sindhudurg: 'गुलदार'चे स्वप्न साकारणार, निवतीच्या समुद्रात स्थापित करण्याची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:49 IST