शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: विजयदुर्ग किल्ल्याचा बुरूज लाटांच्या माऱ्याने ढासळला, तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:41 IST

युनेस्कोच्या ताब्यात गेल्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याचा कायापालट होणार असा विजयदुर्गवासीयांना विश्वास

देवगड : विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱ्या व्यंकट बुरुजाची समुद्रातील लाटांच्या माराने खालची बाजू ढासळली. त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच असल्याचे दिसून येत आहे. पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड होत असते.पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असल्याने लाटांचा वेग यादरम्यान वाढत असतो. अशातच रात्रीच्या वेळेस किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील खालची बाजू ढासळली. किल्ल्याची बांधणी करताना, तसेच त्याची व्याप्ती वाढवताना त्यावेळेस सागर तटबंध आणि खडकांची नैसर्गिक रचना याचा विचारपूर्वक वापर करण्यात आला होता. विजयदुर्ग किल्ला हा खडकाळ द्वीपकल्पावर बांधलेला आहे. त्यामुळे तीन बाजूने खोल पाण्याचा व नैसर्गिक खडकांचे संरक्षण मिळतं. तत्कालीन परिस्थितीत समुद्राच्या लाटा सरळ तटबंदीवर आढळून किल्ल्याचे नुकसान होऊ नये म्हणून तिरक्या उताराची खडकांची मांडणी केली होती. जेणेकरून लाटांची ऊर्जा कमी होऊन ती परत समुद्रात वळवली जाते. कालांतराने निसर्गातील बदलांमुळे ही रचना कमकुवत होत गेली. मात्र नंतर हा मारा थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत.‘ट्रायपॉड’ हा त्यावर उत्तम पर्याय होता. काँक्रीटच्या माध्यमातून हा ट्रायपॉड उभारणे आता गरजेचे झाले आहे. दरम्यान, आता युनेस्कोच्या ताब्यात हा किल्ला गेल्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याचा कायापालट होणार आणि किल्ल्याची कोसळलेली तटबंदी पुन्हा भक्कमपणे उभी राहणार, असा विश्वास विजयदुर्गवासीयांमधून व्यक्त होत आहे.