शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg News: वागदे येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणारा टेम्पो उलटला, अनेक जण गंभीर जखमी 

By सुधीर राणे | Updated: May 2, 2023 17:02 IST

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावर  कणकवली तालुक्यातील वागदे येथील एका हॉटेल समोर लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जाणारा टेम्पो ...

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावर  कणकवली तालुक्यातील वागदे येथील एका हॉटेल समोर लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जाणारा टेम्पो उलटून भीषण अपघात झाला. अपघातात जवळपास २५ पेक्षा अधिकजण जखमी झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज, मंगळवारी (दि.२) दुपारच्या सुमारास झाला. देवगड, पाडगावच्या दिशेने हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात असताना पिकअप चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे पिकअप गाडी रस्ता दुभाजकावर गेली. तसेच महामार्गावर पिकअप टेम्पो पलटी झाला. यात अनेकांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्गावरून जाणाऱ्या वागदे सरपंच संदीप सावंत, राजा पाटकर यांच्यासह अन्य नागरिकांनी  जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. खासदार विनायक राऊत, नीलम सावंत, सुशांत नाईक, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष रंजन राणे यांच्यासह अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या अपघातात अनेकांना गंभीर इजा झाली असून त्याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात