शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

उद्योगमंत्री उदय सामंत बनले मुख्यमंत्र्यांचे 'सारथी'; भराडी देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात

By अनंत खं.जाधव | Updated: February 4, 2023 13:04 IST

आंगणेवाडीत भाविकांचा महापूर उसळणार

सावंतवाडी : दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव आज, शनिवारी होत आहे. भराडीमातेच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. चिपी विमानतळावरुन मुख्यमंत्री आगणेवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत स्वतः त्यांच्या गाडीचे सारथी बनले. राज्यातील सत्तातंरानंतर मुख्यमंत्री शिंदे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारा वाजून पंधरा मिनिटांनी नियोजित वेळेत चिपी विमानतळावर दाखल झाले. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, अनारोजीन लोबो, निता कविटकर, सचिन वालावलकर आदींनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते थेट मालवणच्या दिशेने रवाना झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे हे देखील आहेत.वस्त्रालंकारानी सजलेले देवीचे रुप पाहण्याचे भाग्य यात्रेच्या दिवशी लाभत असल्याने आंगणेवाडीत भाविकांचा महापूर उसळणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यानी पूर्ण केली आहे. एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यांनी आंगणेवाडी व परिसर गजबजून गेला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत