शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सकेंश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातूनच जाणार, बांधकाम विभागाकडून शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 18:31 IST

अनंत जाधव सावंतवाडी : महाराष्ट्र - कर्नाटकला जोडणारा नवा संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की बाहेरून याचीच चर्चा सुरू ...

अनंत जाधवसावंतवाडी : महाराष्ट्र - कर्नाटकला जोडणारा नवा संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की बाहेरून याचीच चर्चा सुरू होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून हा मार्ग सावंतवाडी शहरातूनच जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी तसा प्रस्ताव आमच्याकडून गेल्याचे स्पष्ट केल्याने चर्चाना ब्रेक लागणार आहे.यूपीए सरकारच्या काळात रेडी संकेश्वर महामार्ग अस्तित्वात आला होता. पण केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संकेश्वर रेडी ऐवजी संकेश्वर-बांदा महामार्ग करण्याचे निश्चित केले. त्यानंतर महामार्ग विभागाकडून सर्वेक्षण ही करण्यात आले. त्यात कर्नाटक मधील संकेश्वर व महाराष्ट्रातील बांदा अशी दोन जंक्शन करण्याचे निश्चित करण्यात आले असून हा नवीन मार्ग संकेश्वर ते बांदा १०३ किलोमीटरचा असणार आहे.हा मार्ग कर्नाटकातून संकेश्वरवरून येथून सुरू होणार असून, कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज-आजारा तर सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोली-माडखोल-सावंतवाडी-इन्सुली वरून तो महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या बांदा येथे जोडला जाणार आहे. या नव्या महामार्गाची ओळख ही एनएच ४८ म्हणून करण्यात आली असून, तो इन्सुली येथील खामदेव नाका येथे  एनएच ६६ ला जोडला जाणार आहे.दरम्यान या प्रस्तावित रस्त्याचा अद्यादेश ही काढण्यात आला आहे. आंबोली चे प्रवेशद्वार म्हणजेच आजारा फाटया पर्यत या नव्या मार्गाच्या कामाची निर्विदा प्रकिया ही पूर्ण करण्यात आली असून त्या पुढील रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुरूवातीला हा रस्ता आंबोलीतून उतरल्या नंतर बावळट येथून बांदा येथे जोडला जाईल असे सांगण्यात येत होते.मात्र, बांधकाम विभागाकडून हा मार्ग सावंतवाडी शहरातूनच जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आंबोली पासून इन्सुली पर्यत या मार्गाचे चार टप्पे करण्यात आले आहेत. यात आंबोली पासून बावळट तिट्टा पहिला तेथून बुर्डी फूल हा दुसरा टप्पा तर शहरातील गवळी तिट्टा हा तिसरा आणि इन्सुली खामदेव नाका हा चौथा टप्पा असणार आहे. तसा प्रस्ताव ही बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाला हस्तांतरण करण्या ची प्रकिया पुढील वर्षांत सुरू होणार असेही कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी सांगितले.'लोकमत'ने सर्वात आधी दिले होते वृत्तसकेंश्वर-बांदा मार्ग सावंतवाडीतूनच जाणार असल्याचे वृत्त सर्व प्रथम 'लोकमत'ने दिले होते. मात्र नंतर काहींनी ही अफवा पसरवत आपल्या पध्दतीने नवनवीन मार्ग निर्माण केले होते. पण मध्यंतरी राष्ट्रीय महामार्ग विभागानेच अद्यादेशासह पत्र जाहीर केले तर बांधकाम विभागाकडून ही हा मार्ग शहरातूनच जाणार यावर शिक्कामोर्तब केल्याने आता अफवांना ब्रेक लागणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग