शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

राज्यातील शत्रू मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू, केंद्राला आतापर्यंत ३,४०० कोटींचा महसूल मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:19 IST

राज्यात २०८ मालमत्ता : सिंधुदुर्गात एक, रत्नागिरीत अकरांचा समावेश

ओरोस : पाकिस्तान व चीनचे नागरिकत्व पत्करलेल्या लोकांच्या भारतामध्ये मालमत्ता आहेत. त्यातून त्यांना बेदखल करण्याची तसेच या मालमत्ता विकण्याची प्रक्रिया केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरू केली आहे. अशा मालमत्तांना शत्रू मालमत्ता (एनिमी प्रॉपर्टी) असे म्हटले जाते. महाराष्ट्र राज्यात अशा २०८ मालमत्ता असून, पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे १ तर रत्नागिरी जिल्ह्यात ११ ठिकाणांचा समावेश आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात ही शत्रू मालमत्ता असून, त्याची किंमत सुमारे १० कोटी रुपये एवढी आहे. या शत्रू मालमत्तेची विक्री करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. या मालमत्ता सध्या कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी फॉर इंडिया (सीईपीआय) यांच्या ताब्यात आहे.पाकिस्तान व चीनचे नागरिकत्व पत्करलेल्या लोकांच्या भारतामध्ये मालमत्ता आहेत. अशा देशभरात १२,६११ मालमत्ता असून, त्यांची किंमत सुमारे १ लाख कोटी रुपये आहे. त्यांची विक्री करण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने सुधारणा केली आहे. शत्रू मालमत्ता गटातील ज्या मालमत्तांची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, ती जागा खरेदी करण्यासाठी सध्या तिथे राहात असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. त्याने ही जागा विकत न घेतल्यास नियमानुसार ती इतरांना विकण्यात येणार आहे.

केंद्राला आतापर्यंत ३,४०० कोटी रुपयांचा महसूल मिळालाएक कोटी रुपये व त्याहून अधिक आणि १०० कोटी रुपयांपेक्षा कमी मूल्य असलेल्या शत्रू मालमत्तांची सीईपीआय ई-लिलाव किंवा अन्य कायदेशीर मार्गाने विक्री करू शकते. शत्रू मालमत्तेपैकी सोने, शेअर अशा जंगम संपत्तीची विक्री करून केंद्र सरकारला आतापर्यंत ३,४०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मात्र, शत्रू मालमत्तांपैकी १२,६१९ जागांची अद्याप सरकारने विक्री केली नव्हती.

कमालीची गोपनीयताशत्रू मालमत्तांसंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गोपनीय विषय असल्याचे सांगत ह्या विषयाची माहिती देणे टाळले.

ही मालमत्ता हडपण्याचा घाट तर नाही नाशत्रू मालमत्तेसंदर्भात प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. या गुप्ततेमुळे जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले असून, ही मालमत्ता हडपण्याचा घाट काही व्यक्तींकडून सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.एकूण शत्रू मालमत्तामहाराष्ट्र : २०८सिंधुदुर्ग : १ (वेंगुर्ला)रत्नागिरी : (११)

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaharashtraमहाराष्ट्र