शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

युती तोडणाऱ्यांना जनताच जागा दाखवेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 11:44 IST

कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेना आणि भाजपची ३० वर्षे पारंपरिक युती होती. ही युती ज्यांनी तोडली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले ...

कुडाळ (सिंधुदुर्ग) : शिवसेना आणि भाजपची ३० वर्षे पारंपरिक युती होती. ही युती ज्यांनी तोडली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी लगावला.कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर माजी खासदार नीलेश राणे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक, राजापूरचे शिवसेना उमेदवार किरण सामंत, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, शिवसेना पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर, दीपक वेतकर, बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकणी जनतेने एका हातात धनुष्य-बाण आणि कमळ हाती घेतले आहे. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे. आम्ही विकासाला चालना देण्याचे काम करीत आहोत. महायुतीचा विकास हाच अजेंडा असून, कोकण विकासाचा बॅकलॉग भरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक दिवसमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना आणि कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. नीलेश राणे यांची घर वापसी आहे. नारायण राणे यांचे आभार मानतो, कारण त्यांच्या प्रवेशाला परवानगी दिली. नीलेश राणे यांच्या प्रवेशाने महायुतीची ताकद वाढली. दिवाळीचे फटाके फोडा आणि नीलेश राणे यांच्या विजयाचे फटाके फोडायला मी येईन. नीलेश राणेंच्या प्रवेशाने महायुतीला एक बळ मिळाले आहे.

शिवसेनेत फाटाफूट झाली नसती तर..आम्ही सर्वजण एकत्र आहोत. कोकण हा बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे. एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री आम्ही बघितले आहे. कार्यकर्ते कसे जपायचे हे राणे यांच्याकडून शिकायचे आहे. आम्ही पोटनिवडणूक पाहिली आहे. कर्तृत्ववान माणसे कशी घालवायची हे काम उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे. शिवसेनेत फाटाफूट झाली नसती, तर कोणी आव्हान दिले नसते, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kudal-acकुडाळShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNilesh Raneनिलेश राणे