Sindhudurg: अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा पोचला 100 वर, सांगेली नवोदय विद्यालयातील प्रकार

By अनंत खं.जाधव | Published: March 8, 2024 04:06 PM2024-03-08T16:06:51+5:302024-03-08T16:08:51+5:30

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल तब्बल 100 च्या वर विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून ...

The number of students of Sangeli Navodaya Vidyalaya has reached 100 due to food poisoning | Sindhudurg: अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा पोचला 100 वर, सांगेली नवोदय विद्यालयातील प्रकार

Sindhudurg: अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा पोचला 100 वर, सांगेली नवोदय विद्यालयातील प्रकार

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल तब्बल 100 च्या वर विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मात्र काहिची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान मेसमध्ये रात्रीचे जेवण घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना उलटी व झुलाब सुरू झाल्याने येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुरूवातीला 43 मुले होती त्यात आणखी भर पडली असून 100 च्या वर आकडा पोचला आहे. जेवणात वापरण्यात आलेले बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी, असा  अंदाज शाळेतील शिक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे. नवोदय विद्यालयात तब्बल 408 विद्यार्थी असून त्यातील 100 च्या वर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. 

दरम्यान काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत आहे. चिंताजनक प्रकृती असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी किशोर तावडे सांगेलीकडे रवाना झाले आहेत. तर खासदार विनायक राऊत पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत. 

Web Title: The number of students of Sangeli Navodaya Vidyalaya has reached 100 due to food poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.