शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

Sindhudurg: फोंडाघाटात कोसळलेली दरड हटवली, वाहतूक सुरळीत

By सुधीर राणे | Published: September 09, 2023 5:29 PM

कणकवली: जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सुरक्षित असलेल्या कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात ६२/६६०० किलोमीटर अंतरावरील परिसरात शनिवारी सकाळी दरडी ...

कणकवली: जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सुरक्षित असलेल्या कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात ६२/६६०० किलोमीटर अंतरावरील परिसरात शनिवारी सकाळी दरडी कोसळली. दरडीचे दगड, मलबा, माती रस्त्यावर पसरल्याने तेथील वाहतूक बंद झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. रस्ता बंद झाल्याचे समजताच नेहमी फोंडाघाटात हजर असणारे वाहतूक पोलिस तत्काळ कार्यरत झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता बंद झाल्याची माहिती समजताच उपकार्यकारी अभियंता के.के. प्रभू, शाखाअभियंता प्रमोद कांबळे तसेच कर्मचारी शाहू शेळके, पावसकर, सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पवन भालेकर यांच्या जेसीबी द्वारे दरडी हटवून एक मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. मात्र घळणीवरून पाझरणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे  कालांतराने दरडी कोसळत होत्या.यादरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी,कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, खारेपाटण तलाठी अरुणा जयानावर, फोंडा मंडळ अधिकारी नीलिमा प्रभू, कोतवाल पांडुरंग राणे यांच्यासह अधिकारी वर्गाने, दरडी कोसळत असलेल्या ठिकाणाची पाहणी केली. तसेच कर्मचाऱ्यांना सूचना देऊन दरडी हटवून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घाटातील वाहतूक दोन्ही बाजूनी सुरू करण्यात आली. मात्र, सतत पाऊस पडल्यास रस्ता रुंदीकरणामुळे घळणी मोकळ्या झाल्याने, दरडी कोसळण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. तेथील स्थितीवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस लक्ष देऊन आहेत. दोन जेसीबी तसेच कर्मचारी घटनास्थळापासूनच जवळच कार्यरत ठेवण्यात आले आहेत. असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlandslidesभूस्खलन