शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वाईन बाबतच्या निर्णयावर सरकार ठाम, काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात; गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:02 IST

कोणताही निर्णय घेतला तर तो काहीना आवडेल काहीना आवडणार नाही

सावंतवाडी : वाईन बाबतचा निर्णय हा महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्षानी एकत्र बसून केला आहे. सरकार चालवताना उत्पादन वाढीबाबत काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात. भाजपने ही आपल्या काळात घेतलेच होते. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला तर तो काहीना आवडेल काहीना आवडणार नाही. मात्र वाईन बाबत च्या निर्णयावर सरकार ठाम असल्याचे राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.गोवा येथे  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना काहीकाळ मंत्री पाटील हे सावंतवाडी येथे माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांच्या निवास्थानी थांबले असता  पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, जिल्हा सरचिटणीस राजु मसुरकर, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहर अध्यक्ष अॅड राघवेंद्र नार्वेकर,उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, विभावरी सुकी, नागेश मोरये, संदिप सुकी, अभय शिरसाट, आदी पदाधिकारी उपस्थित होते.पाटील म्हणाले, कुडाळ नगरपंचायत सत्तास्थापनेत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच राहू. परंतु नगराध्यक्ष पदाबाबत काँग्रेस म्हणून आमच्या काय अपेक्षा आहेत याबाबत लवकरा शिवसेनेशी चर्चा केली जाईल असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मधल्या काळात काँग्रेसला वाईट दिवस आले हे सत्य आहे. परंतु राजकारणात प्रत्येक पक्षाला यातून जावे लागते. अलीकडेच नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला यश आले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही संचालक म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी निवडून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून जिथे शक्य आहे तिथे महाविकासआघाडी अन्यथा मैत्रीपूर्ण लढत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्ष ताकतीने उतरणार असेही त्यांनी नमूद केले.राज्यात वाईन विक्रीला परवानगी दिल्याने विरोधक राजकीय रंग देऊन विनाकारण जनतेची दिशाभूल करत आहे. राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने संयुक्तिक आहे असे सांगत  असतानाच काही कठोर निर्णय सरकार म्हणून करावे लागत असल्याचेही ते म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महा विकास आघाडी म्हणून काम करत असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्या बाबतचा तक्रारी आपल्या कानावर आल्या आहेत. या संदर्भात जिल्ह्याचा समन्वयक म्हणून मी  काम करत आहे.  महाविकासआघाडी म्हणून काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन जाण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाला योग्य ते झुकते माप देणे बाबत आपला प्रयत्न राहणार आहे. असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ता स्थापनेमध्ये आमचा फॉर्मुला हा महाविकासआघाडी म्हणूनच असणार आहे परंतु नगराध्यक्षपदाबाबत आमची अपेक्षा काय असेल याबाबत निश्चितच चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.अदयाप निवडणुक लाब असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील