शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा उघडणार, पर्यटकांना १ सप्टेंबरपासून प्रवेश मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:20 IST

पर्यटकांची प्रतीक्षा संपली, मुख्य प्रवेशद्वारासह तटबंदीची होणार दुरुस्ती

संदीप बोडवेमालवण (सिंधुदुर्ग) : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचे दरवाजे १ सप्टेंबरपासून उघडले जाणार आहेत. पावसाळ्यात शासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश बंदी केलेली असते. या दरम्यान किल्ले प्रवासी होडी वाहतूकही बंद असते. आता लवकरच किल्ल्याचे दरवाजे खुले होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीचेही काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले असून लवकरच किल्ल्याचे रूप पालटल्याचे आपणास पाहावयास मिळणार आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. किल्ल्यावर जाण्यासाठी मालवण येथील मुख्य जेटीवरून मोठ्या नौकेत बसून समुद्रातून प्रवास करावा लागतो. हा एक वेगळाच अनुभव असतो. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो.

लवकरच किल्ल्याचे रूप पालटणार....सिंधुदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीचे प्रस्ताव पुरातत्त्व विभागासमोर आहेत. यानुसार किल्ल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. - वैभव बेटकर, अधिकारी पुरातत्त्व विभाग

किल्ल्याला मिळणार नवीन महादरवाजासिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागासमोर आहे. यानुसार किल्ल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे.

समुद्र बऱ्यापैकी शांत झाला आहे. १ सप्टेंबरपासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने रीतसर किल्ला प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. किल्ला प्रवासी आणि पर्यटकांना सुरक्षित सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. - मंगेश सावंत, अध्यक्ष किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगडtourismपर्यटन