शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आशिया खंडातील पहिले सागरी संग्रहालय, गुलदार युद्धनौकेच्या प्रकल्पाने सिंधुदुर्गचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:36 IST

भारत सरकारने युद्धनौकेसह ५० कोटींचा निधीही दिला : गुलदार युद्धनौकेचा आनंद पाणबुडीतून घेता येणार

संदीप बोडवेमालवण : सिंधुदुर्गच्या दृष्टीने सुवर्णाक्षरांनी आजचा दिवस लिहिला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन जिल्हा घोषित झाल्यानंतर घडलेल्या आजवरच्या अनेक स्थित्यंतरांमधील गुलदार युद्धनौकेच्या प्रकल्पाने सिंधुदुर्गचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे नोंदविले गेले आहे. त्याचप्रमाणे हा उपक्रम ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंदविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलंड देशातून खरेदी केलेली युद्धनौकानिवृत्त युद्धनौका गुलदारची उंची २२ मीटर, लांबी ८३.९ मीटर, वजन ११२० टन, मूळ देश पोलंड येथून खरेदी केली आहे.

या नौकेचा वर्ग व प्रकारही कुंभीर वर्गाची उतरणी युद्धनौका आहे. नौदलाची चार दशक सेवा बजावून आता तिच्या पुढच्या प्रवासासाठी सज्ज होत आहे. युद्धनौकेच्या या संपूर्ण संग्रहालयाच्या प्रक्रियेमध्ये एकूण पाच टप्पे येतात, यातील पहिला टप्पा नौदलाकडून युद्धनौकेचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे झालेले हस्तांतरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने २१ फेब्रुवारी २०२५ रोजी गुलदारचे नौदलाकडून हस्तांतरण करण्यात आले.

चौथ्या टप्प्यामध्ये नौका सागरतळाशी विराजमान होणारप्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजे युद्ध नौकेचे सिंधुदुर्गात झालेले आगमन. इंजिन नसलेल्या युद्धनौकेला टग बोटिच्या सहाय्याने खेचून विजयदुर्गाच्या समुद्रकिनाऱ्यावर आणून स्थिर करण्यात आले. यानंतर तिसऱ्या टप्प्याची सुरुवात होते ती म्हणजे युद्धनौकेच्या पोटात असलेल्या सर्व पर्यावरणासाठी हानिकारक घटकांची स्वच्छता आणि चौथ्या टप्प्यामध्ये युद्धनौकेला तयार करण्यात आले. चौथ्या टप्प्यामध्ये ही नौका २० ते २२ मीटर खोल सागरतळाशी विराजमान होणार आहे.

गुलदार जलप्रेमींना भेटण्यासाठी सज्जगुलदार नौका तिच्या धडाडीच्या व कार्यक्षमतेच्या आठवणींसह आता ती पर्यटकांना, अभ्यासकांना व साहसी जलप्रेमींना भेटण्यासाठी सज्ज होत आहे. या संग्रहालयाचे दर्शन तितकेच खास असणार आहे. स्कुबा डायव्हिंग आणि पाणबुडीच्या साहाय्याने पर्यटक बेट सागर तळाशी जाऊन या युद्धनौकेचा अनुभव घेणार आहेत. इथे उभे राहणार प्रवाळ, समुद्री गवत, रंगीबेरंगी मासे आणि जैवविविधतेने परिपूर्ण असे समुद्रातील जग अनुभवू शकता. हे सर्व पाहण्यासाठी स्थानिक स्कुबा डायव्हर्स मार्गदर्शक म्हणून काम करतील, तर तरुणांसाठी डाइव्ह मास्टर्स हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.

पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची प्रकल्पात होती योजनामागील दहा-पंधरा वर्षांत सी वर्ल्ड, पर्यटनासाठी विराट युद्धनौका, अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांची सातत्याने चर्चा करण्यात येत होती; परंतु दुर्दैवाने यातील एकही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. २०१८ साली देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्गमधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्सजवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना होती. हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतल्याचीही चर्चा रंगली होती. यावर विरोधकांकडून राज्य शासनावर सातत्याने टीका करण्यात आली होती.