शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती हटाव मोहीम पावसाळ्यानंतर राबविणार, वाढीव नुकसान भरपाईसाठी शासन प्रयत्नशील - मंत्री केसरकर

By अनंत खं.जाधव | Updated: September 11, 2023 18:03 IST

सावंतवाडीत विशेष बैठक

सावंतवाडी : हत्ती तसेच अन्य वन्य प्राण्यांनी मोठ्याप्रमाणात शेती बागायतीची नुकसानी केली असून त्याची नुकसान भरपाई वाढीवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. लवकरच याबाबत शासन निर्णय घेतला जाणार आहे. तसेच हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पावसाळ्यानंतर विशेष मोहीम राबवण्यात येईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.दोडामार्ग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती व वन्य प्राण्यांकडून शेती बागायतींचे होणारे नुकसान लक्षात घेता मंत्री केसरकर यांनी सोमवारी येथील वनविभागाच्या कार्यालयात हत्ती हटाव समितीचे प्रमुख तसेच शेतकरी बांधवांसोबत वाढीव नुकसान भरपाई संदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसिलदार श्रीधर पाटील  उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फळझाडांना वाढीव नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यात नारळ हे पीक जास्त करून कोकणामध्ये अधिक असल्याने त्यासाठी वेगळा निकष ठेवून जास्त नुकसान भरपाई देण्याचे सुचवले. हत्ती लहान नारळाच्या झाडांचे जास्त नुकसान करतो. त्यामुळे झाडाच्या वयोमानानुसार नुकसान भरपाई नको तर सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तर ज्याप्रमाणे एखाद्या वेळी वनविभागाच्या हद्दीतील झाडांची तोड झाल्यावर शेतकऱ्याला जी शिक्षा होते, त्याप्रमाणे वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या झाडाचे नुकसान केल्यास त्यानुसार नुकसान भरपाई मिळावी असेही मागणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करता मंत्री केसरकर यांनी मोठ्या झाडाला तीस हजार रुपये तर लहान झाडाला पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई बाबत एकमत केले. तसेच दिवाळी नंतर हत्ती हटाव मोहीम राबविण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर, शैलेश दळवी,जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, हत्तीबाधीत समितीचे सदस्य पंकज गवस, संतोष गवस, विष्णू देसाई, गोपाळ गवस,यांच्यासह हत्ती बाधित गावातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागFarmerशेतकरीDeepak Kesarkarदीपक केसरकर