शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

कणकवली-निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृतदेह असलदेतील रिक्षाचालकाचा

By सुधीर राणे | Updated: February 24, 2024 16:10 IST

कणकवली: कणकवली निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह ...

कणकवली: कणकवली निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह रिक्षाचालक अजय उर्फ तातोबा गणपत घाडी (४३, रा. असलदे) यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

कणकवली पोलिस व  रेल्वे सुरक्षा बलाने घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर चौकशी करतानाच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक तरुण रेल्वे ट्रॅकवरून चालत जाताना दिसला होता. त्याची रिक्षा रेल्वे स्थानक वाहनतळावर पार्क केली होती. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून माहिती दिली. त्यांनी कणकवली येथे येऊन मृतदेह, कपडे व चप्पल पाहिल्यानंतर त्याला ओळखले. त्यामुळे तो मृतदेह रिक्षाचालक अजय उर्फ तातोबा गणपत घाडी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तातोबा घाडी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, असलदे येथील अजय  घाडी हे  शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरामधून रिक्षा घेवून  नेहमीप्रमाणे नांदगाव रिक्षा स्टँड येथे गेले होते. मात्र, सायंकाळी ६ वाजले तरी ते घरी परतले नव्हते. त्यांच्या शेजारच्या आजारी असलेल्या एका मुलाला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी रिक्षा हवी असल्याने त्यांना कुटुंबीयांनी फोन लावला तर तो बंद होता.दरम्यानच्या काळात कणकवली रेल्वे स्थानक परिसरात त्यांची रिक्षा उभी असल्याचे ग्रामस्थ व पोलिसांनी घाडी यांच्या कुटुंबियाना कळवले. त्यानंतर त्यांचे भाऊ व नातेवाईक कणकवली येथे आले. भाऊ मारुती घाडी यांना पहिल्यांदा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी  उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात नेले. त्यानंतर तातोबा घाडी याचाच तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना सांगितले.तातोबा घाडी यांनी कणकवली रेल्वे स्थानक वाहन तळावर आपली रिक्षा उभी केली होती. त्या ठिकाणी पोलिसांना मोबाईल, रिक्षेची चावी, ओळखपत्र, रोख रक्कम आढळली आहे.  पोलिसांनी याप्रकरणी मारुती घाडी यांचे जबाब नोंदविले आहेत. तसेच सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अजय घाडी हे प्रामाणिक रिक्षाचालक म्हणून परिचित होते. नांदगाव तिठा येथे ते रिक्षा व्यवसाय करीत असत. तेथील सन्मित्र रिक्षा संघटनेने शनिवारी रिक्षा बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा,मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार विनोद सुपल,चंद्रकांत झोरे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस