शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

तीन नंबरचा बावटा हटला, सागरी पर्यटन प्रश्न सुटला; किल्ले सिंधुदुर्गवरली होडी सेवा दहा दिवसांनंतर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:04 IST

समुद्रातील चक्रीवादळामुळे होते ठप्प

मालवण : अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व सागरी पर्यटन गेले दहा दिवस ठप्प होते. आता समुद्रातील वादळ शांत झाले असून वातावरण पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे बंदर विभागाकडून लावण्यात आलेला धोक्याचा तीन नंबर बावटा उतरविण्यात आला असून किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी सेवा व सागरी पर्यटन रविवार दोन नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. याबाबतची माहिती बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी दिली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सद्य:स्थितीत हवामान चांगले असल्यामुळे गेले दहा दिवस बंद असलेली सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक, वॉटर स्पोर्टस्, पॅरासिलिंग पर्यटन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती बंदर विभागाने दिली आहे.दरवर्षी १ सप्टेंबरपासून सागरी पर्यटन हंगामाची सुरुवात होते. दिवाळी सुटी कालावधी हा पर्यटन हंगामाचा प्रमुख कालावधी मानला जातो. मात्र, समुद्रातील वादळ स्थितीमुळे हा संपूर्ण दिवाळी हंगाम सागरी पर्यटनाच्या दृष्टीने ठप्प झाला. याचा मोठा परिणाम पर्यटन व्यवसायाला बसला आहे. वॉटर स्पोर्टस्, पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग, किल्ले प्रवासी होडी वाहतूक, यासोबतच हॉटेल व्यवसाय क्षेत्रालाही अनेक बुकिंग रद्द झालेत. या कालावधीत पर्यटकांची रेलचेल थांबल्याने मोठा आर्थिक फटका मालवणच्या पर्यटन क्षेत्रासोबत अर्थकारणाला बसला आहे. आता पुन्हा एकदा पर्यटनाची नवी सुरुवात झाली आहे.येवा समुद्र आपलोच आसाचक्रीवादळामुळे ऐन पर्यटन हंगाम तोट्यात गेल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटन व्यावसायिक पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत. किनारपट्टीवर सागरी जलक्रीडा प्रकार, स्कुबा डायव्हिंग आणि समुद्रातील पॅरासिलिंग पुन्हा पूर्वपदावर येत आहेत. मासेमारी बोटीसुद्धा खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यासाठी सज्ज असून बाजारात मासळीची आवक सुरू होणार आहे. पर्यटकांनी मासे आणि सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पुन्हा एकदा किनारपट्टीकडे वळावे, असे आवाहन पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg Fort Boat Service Resumes After Cyclone; Tourism Revives

Web Summary : After a ten-day halt due to a cyclone, boat services to Sindhudurg Fort have resumed. The Diwali tourism season was significantly impacted, affecting water sports, hotels, and local businesses. With improved weather, tourism operators are ready to welcome visitors back to enjoy coastal activities and fresh seafood.