शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

Sindhudurg: ओसरगावात आढळला महिलेचा जळालेला मृतदेह, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

By सुधीर राणे | Updated: February 26, 2025 16:17 IST

फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी

कणकवली : तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे एक जळालेल्या स्थितीत साधारणतः ३५ ते ४० वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे, तसेच मृतदेह बाहेरून आणून येथे जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली.ओसरगाव येथे एमव्हीडी कॉलेजपासून काही अंतरावर महामार्गापासून सुमारे १०० मीटरवर एकाच ठिकाणी आग पेटताना ग्रामस्थांना दिसून आली. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, बहुतांशी मृतदेह जळालेला होता, तर त्या महिलेचा फक्त एक पायच शिल्लक होता. त्यामध्ये पैंजणही आढळून आला आहे. त्या महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून विविध माध्यमातून सुरू आहे, तसेच त्या महिलेचे घटनास्थळी पोलिसांना मिळालेले अवयव सायंकाळी उशिरा दफन करण्यात आले.

फॉरेन्सिक लॅबकडून तपासणीया घटनेबाबत माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, पोलिस निरीक्षक मारुती जगताप, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासहित अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गापासून सुमारे १०० मीटर अंतरावर मृतदेह पेट्रोल अथवा डिझेल ओतून जाळण्यात आला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोल्हापूर येथून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळावरून काही नमुने संकलित केले.

ओळख पटविण्यात पैंजण ठरू शकतात उपयोगी!ती महिला कोण, हे अद्याप जरी स्पष्ट झाले नसले, तरी तिच्या पायात आढळलेले मोठ्या नक्षीचे पैंजण कानातली कुडी व हातातील बांगड्या यावरून ती महिला ही चिरेखाण किंवा अन्य ठिकाणी कामगार म्हणून आलेली होती का? हेही तपासण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली.

तपासाचे पोलिसांसमोर आव्हान!या महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला, त्या ठिकाणी वाळू होती, तसेच एक पाय अर्धवट जळालेल्या स्थितीत शिल्लक होता. त्याचबरोबर, शरीरातील डोक्याचा व हाडांचा भाग शिल्लक होता. बाकी सर्व मृतदेह जळून खाक झाला होता. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करणे हे कणकवली पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस