शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र अन् राज्य सरकारने जनतेला देशोधडीला लावले, मनसे नेते परशुराम उपरकरांचा हल्लाबोल

By सुधीर राणे | Updated: April 1, 2023 17:07 IST

३ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन छेडणार

कणकवली: केंद्र सरकार जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करीत आहे. आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी जनतेची फरफट होत आहे. ज्यांनी ते कार्ड लिंक केलेले नाही त्या लोकांना १ हजार रुपये दंड भरावा लागत आहे. केंद्र आणि राज्य सरकार जनतेला त्रास देत असून त्यांनी जनतेला देशोधडीला लावले असल्याचा आरोप मनसेनेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.तसेच ३ एप्रिल रोजी सरकारचा निषेध करीत ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन छेडणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकार सातत्याने नवनवीन  उपक्रम आणून सामान्य नागरिकांची फिळवणूक करीत आहे. ज्यांनी करोडो रुपयांची सरकारांची आणि बँकांची फसवणूक केली, त्यांना सुट दिली जात आहे. ज्यांनी त्यावेळी शून्य रकमेचे बँक खाते उघडले, त्यांना आता एक हजार ते बाराशे रुपयांचा दंड केला जाणार आहे. त्यामुळे ३ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन छेडण्यात येणार आहे.आता रेशनकार्ड पुरावा बंद करत आधारकार्ड नोंदणी सरकारने करायला लावली आहे. तसेच जुने आधार कार्ड पुन्हा अपडेट करायला सांगितले आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांना पडत आहे. बँकेतून पैसे काढणे आणि भरण्यासाठीही आता शुल्क आकारले  जात आहे हे केंद्र सरकारचे पाप असल्याचा टोला उपरकर यांनी लगावला. ..त्यामुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना आणली. धूरामुळे महिलांच्या डोळ्यात पाणी येवू नये हे धोरण सरकारचे होते. आता तो गॅस विकत घ्यावा लागत असल्याने महिलांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता गॅस १११७ रुपयाने घ्यावा लागतो ही जनतेची फसवणूक आहे. घरगुती गॅसचे अनुदान सुरुवातीला बँक खात्यावर जमा केले आणि आता ती अनुदानाची रक्कम देणे बंद केले आहे. काही महिने धान्य वितरण मोफत केले आणि आता त्याचे पैसे लोकांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.तेही  केव्हा गायब होतील हे सांगता येणार नाही.ही रेशन धान्य बंद करण्याची व्यूहरचना असल्याचा आरोप उपरकर यांनी केला. जनतेने विचार करण्याची गरज लोकांची सहानूभूती मिळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाकडून सामान्य जनतेची पिळवणूक सुरू आहे. आता जनतेने विचार करण्याची गरज आहे. ज्या सवलती मिळतात त्या सरकार तुमच्या खिशातील रक्कम काढून तुम्हाला देत असते. हे लक्षात घ्यायला हवे.राज्य सरकार नोकर भरती करणार म्हणून अनेक  बेरोजगार प्रतीक्षेत होते. त्यासाठीही ९ कंपन्या नेमल्या गेल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे असूनही जिल्ह्यातील ठेकेदारांची १३ कोटी रुपयांची कामाची बिले थकीत आहेत. कोट्यवधी रुपये निधी आल्याची घोषणा केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात काहीही कामे होत नाहीत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCentral Governmentकेंद्र सरकारInflationमहागाईMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर