शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी घाटात ब्रेक निकामी झाला, मालवाहू पिकअप कार शंभर फूट खोल दरीत कोसळली; अन् मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 18:49 IST

गाडी दरीत कोसळत असल्याचा अंदाज आल्याने चालक व वाचकाने गाडीतून उड्या घेतल्या

संदेश देसाईदोडामार्ग : तिलारी घाटात ब्रेक निकामी झाल्याने टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात झाला. गाडी शंभर फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने गाडी झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. गाडीचे व टोमॅटोचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक व वाहक बालबाल बचावले. हा अपघात आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास झाला.तिलारी घाट अतिशय तीव्र उतार व नागमोडी वळणाचा आहे. चालकाला वळणाचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अनेक अपघात होत आहेत. या घाटातून वाहने हाकत असताना तारेवरची कसरत करावी लागते. रात्री अपरात्री ब्रॉयलर कोंबडी तसेच भाजी पाल्याची वाहतुक मोठया प्रमाणात होत असते. आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास महिंद्रा बोलेरो पिकअप घाट माथ्यावरून गोव्याच्या दिशेने टोमॅटोची वाहतूक करीत होता. हा टोमॅटो पणजी भाजी मंडईकडे घेवून निघाला होता. घाट उतरत असताना पिकअपचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून गाडी सुमारे १०० फूट दरीत कोसळली. झाडाला गाडी अडकल्याने हजार फूट दरीत कोसळण्यापासून बचावली. गाडी दरीत कोसळत असल्याचा अंदाज आल्याने चालक व वाचकाने गाडीतून उड्या घेतल्या. केवळ दैव बलवत्तर म्हणून चालक व वाहक सुखरूप बचावले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात