शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीस प्रारंभ, काम कधी पूर्ण होणार.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:14 IST

भल्या मोठ्या क्रेन किल्ले राजकोट येथे दाखल 

मालवण : मालवण किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून राम सुतार आर्ट्स क्रिएशन या राष्ट्रीय स्तरावरील नावलौकिक प्राप्त कंपनीमार्फत सुरू आहे. पुतळ्यासाठी चौथरा उभारणी पूर्ण झाल्यानंतर महाराजांचा पुतळा उभारणीच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. यावेळी शिल्पकार अनिल सुतार यांनी चौथऱ्यावर विधीवत पूजा केल्यानंतर पुतळा उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज खडकावर उभे असल्याचे दाखविण्यात आले असून, याच खडकाचे भाग सर्वप्रथम चौथऱ्यावर क्रेनच्या साहाय्याने ठेवण्यात आले. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. पुतळ्यासाठी चौथरा बांधल्यानंतर शिवजयंतीदिनी पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पायाभरणी करण्यात आली होती.ब्रांझचा खडक चौथऱ्यावर

पुतळा उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली. शिल्पकार अनिल सुतार यांच्या हस्ते आणि आरवली सोन्सुरे येथील शिवचैतन्य गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चौथऱ्यावर पुतळा उभारणी होत असताना विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालवणचे अभियंता अजित पाटील यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच काम करणारे कारागिर उपस्थित होते. यावेळी मोठ्या क्रेनच्या साहाय्याने पुतळ्याचा बेस असलेला तयार केलेला ब्रांझचा खडक चौथऱ्यावर बसविण्यात आला.पुतळा उभारणीचे काम ४५ ते ६० दिवसांत पूर्ण होईलयावेळी अनिल सुतार म्हणाले, हा आंनदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ८३ फूट उंच भव्य पुतळा उभारणीचे काम ४५ ते ६० दिवसांत पूर्ण होईल. १५ एप्रिलपर्यंत आम्ही हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. महाराजांचा पूर्णाकृती तलवारधारी स्वरूपातील हा सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्यासाठी उत्तम दर्जाचे ब्रॉन्झ आणि स्टील वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा पुतळा अनेक वर्षे टिकणारा असेल.

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्यहा पुतळा समुद्रकिनारी असल्याने वाऱ्याचा प्रभाव पाहता, या पुतळ्याची विंड टनेल टेस्ट ऑस्ट्रेलिया येथे करण्यात आली असून, त्याचे सकारात्मक रिझल्ट आले आहेत, असेही अनिल सुतार म्हणाले. या पुतळ्याच्या कामासाठी राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. मालवणमधील नागरिकांचे आम्हाला सहकार्य मिळत आहे, येथे उत्कृष्ट दर्जाचा पुतळा उभा राहणार आहे, असेही ते म्हणाले.

प्रतिकृती राम सुतार यांच्याच देखरेखीखालीराजकोट येथे उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याची छोटी मुख्य प्रतिकृती राम सुतार यांच्याच देखरेखीखाली तयार करण्यात आली. राम सुतार हे दिल्लीत असून प्रकृतीमुळे ते कुठे फिरत नाहीत. मात्र, राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व करत आहोत, असे अनिल सुतार म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगडMalvan beachमालवण समुद्र किनाराShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज