शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

..त्यामुळेच खोटे बोलून जनतेची दिशाभूल करतायत, नितेश राणे यांची महाविकास आघाडीवर टीका

By सुधीर राणे | Updated: October 7, 2024 16:17 IST

'महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची वेळ'

कणकवली: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'मुळे महायुती सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रेम, आपुलकी निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीची झोप उडाली आहे. त्यांना ही योजनाच बंद करायची आहे. त्यामुळेच या योजनेसंदर्भात खोटे बोलून ते जनतेची दिशाभूल करत आहेत अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. कणकवली येथे आज, सोमवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राणे म्हणाले, प्रथम खोटे बोलायचे आणि त्यानंतर न्यायालयासमोर अटक करू नका असे सांगत माफी मागायची, यात संजय राऊत यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. मध्यप्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना सुरळीत चालू आहे. सर्व भगिनींना चांगल्या प्रकारे दर महिन्याला लाभ मिळतो आहे. असे असताना संजय राऊत ही योजना मध्यप्रदेशमध्ये बंद झाली अशी खोटी माहिती देत असतील तर त्यांनी याबद्दलचा एक तरी पुरावा द्यावा. अन्यथा महाराष्ट्रातील  भगिनींची माफी मागावी. असे आव्हान आमदार राणे यांनी दिले. उद्धव ठाकरे यांचे सरकार 'शक्ती' कायदा आणू शकले नाहीप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले. यातूनच महायुती सरकारचे यश दिसून येते. त्यामुळे संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी त्याबाबत विनाकारण बोलू नये. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ते साधा 'शक्ती' कायदा आणू शकले नाहीत. हे त्यांचे मोठे अपयश आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची वेळ संजय राऊत हे ठेकेदारांचे दलाल झालेले आहेत. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे. त्यांना मोती साबण घेणे पण जड झाले आहे. त्यामुळे ते लाडकी बहीण योजनेबद्दल गळा काढत फिरत आहेत. असेही राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी