राष्ट्रवादीचे थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2015 00:27 IST2015-11-01T22:32:39+5:302015-11-02T00:27:36+5:30

तहसीलदारांना निवेदन : कुडाळातील तहसील कार्यालय परिसर घोषणांनी दुमदुमला

Thalinad movement of NCP | राष्ट्रवादीचे थाळीनाद आंदोलन

राष्ट्रवादीचे थाळीनाद आंदोलन

कुडाळ : ‘गली गली मे शोर है युती सरकार चोर है, युती सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय’ अशा घोषणांनी व थाळीनाद आंदोलनाने कुडाळ तहसील कार्यालयाचा परिसर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दणाणून सोडला. यावेळी निवेदन प्रभारी तहसीलदार यांना दिले.
युती सरकारला एक वर्ष पूर्ण होत असून, सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. जनतेच्या समस्यांचे, प्रश्नांचे निराकारण केले नाही. महागाई वाढवून व इतर अनेक प्रश्न निर्माण करून या युती सरकारने जनतेला अच्छे दिन दाखविण्यापेक्षा बुरे दिन दाखविण्यास सुरुवात केली आहे, असे आरोप करीत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने व शासनाला जागे करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने कुडाळ तहसील कार्यालय येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, युवकचे प्रदेश सरचिटणीस अबीद नाईक, प्रांतिक सदस्य अमित सामंत, राष्ट्रवादी कुडाळ तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, उपसभापती आर. के. सावंत, जिल्हा बँक संचालक प्रमोद धुरी, आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या थाळीनाद आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्यावतीने मोठ्या प्रमाणात थाळीनाद तसेच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणांनी कुडाळ परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Thalinad movement of NCP