शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

यापुढे भाजपचाच खासदार, तुम्हाला संधी नाही; नारायण राणेंचा विनायक राऊतांना इशारा 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 3, 2024 19:20 IST

'पुढील ३५ दिवस २४ तास प्रचार करा'

कुडाळ : यापुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचाच खासदार असेल. परत तुम्हाला संधी नाही, असं आम्ही ठरवलं आहे, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी कुडाळ येथे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना दिला. तसेच कोरोना काळात उद्धवसेनेच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेत औषधाचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी लवकरच दोघेही पिता-पुत्र जेलमध्ये जातील, असा टोलाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआदित्य ठाकरे यांना लगावला.कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात बुधवारी भाजपाची संघटनात्मक बैठक झाली. यावेळी राज्याचे बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, बाळ माने, राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई, दत्ता सामंत, संघटक शैलेश दळवी, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, अशोक सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राणे म्हणाले, या खासदाराने आतापर्यंत काय विकासाची कामे केली, हे जाहीर करावे. इथल्या स्थानिक आमदारानेही १० वर्षात विकासाच्या दृष्टीने शून्य काम केले. फक्त नारायण राणे, नीलेश राणे, नितेश राणे यांच्यावर तोंडसुख घेणे, त्यांच्यावर टीका करणे हे त्यांचे काम आहे. आता मी आलोय, आमच्याबद्दल घाणेरडा बोलता, कौतुक नाही तर बोलू नका, यापुढे असं बोलला तर मीसुद्धा जशास तसे उत्तर देईन, असा इशाराही राणे यांनी दिला. माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रणजीत देसाई यांनी केले, तर आभार जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मानले.

पुढील ३५ दिवस २४ तास प्रचार करायावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, अबकी बार ४०४. देशाला नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हवे आहे, हे गावागावात घराघरात जाऊन सांगा. त्यांनी जे काम केले त्या दिशेने जाणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घ्यावी. भाजपचा खासदार जिंकून येण्यासाठी इथून पुढे ३५ दिवस २४ तास प्रचार करा. बुथवर एनडीएच्या उमेदवारासाठी ८० टक्के मतदान मिळण्यासाठी प्रयत्न करा. विरोधकांना मतदान मिळणार नाही हे पटवून द्या.

निवडणुकीत गालबोट लागू देऊ नकाआमदार नितेश राणे यांनी आपला खासदार निवडून येण्यासाठी रणनीती तयार करा. नमस्कार चमत्कार करा, साम-दाम-दंड-भेद नीती अवलंबून निवडणुकीत गालबोट लागू देऊ नका. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी काम करा. नीलेश राणे यांनी विद्यमान खासदार यांनी काय केलं याचा पाढा वाचा, चर्चा करा आपली दहा वर्षे फुकट गेली. विद्यमान खासदार काय करू शकले नाहीत आपल्याला संसदेत प्रश्न मांडणारा, बोलणारा खासदार पाठवायचा आहे, हे पटवून देण्याचे आवाहन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेVinayak Rautविनायक राऊत