देवगडमध्ये ठाकरे सेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत घडली घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 10, 2023 12:16 AM2023-10-10T00:16:50+5:302023-10-10T00:20:16+5:30

पाऊण तास संघर्षमय स्थिती, वातावरण तंग, धक्काबुक्की, मारहाणीचा प्रकार

Thackeray Sena-BJP activists clashed in Devgarh, the incident took place in the presence of MLA Nitesh Rane | देवगडमध्ये ठाकरे सेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत घडली घटना

देवगडमध्ये ठाकरे सेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत घडली घटना

googlenewsNext

महेश सरनाईक, सिंधुदुर्ग: देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण सल्लागार समितीच्या बैठकीच्यावेळी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयामध्येच उबाठा सेनेच्या व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रश्न विचारण्यावरून झालेल्या वादावादीचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले. पाऊणतास चाललेल्या या संघर्षमय वातावरणामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात होती. यावेळी पोलिस कर्मचारीदेखील उपस्थित होते. यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते.
सायंकाळी उशिरा ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक व पदाधिकारी देवगडमध्ये दाखल झाले होते, तर जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनीही देवगडला भेट दिली. आतापर्यंतच्या देवगडच्या इतिहासामध्ये पक्षांमध्ये समोरासमोर धक्काबुक्की व मारामारी होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. या घटनेमुळे शांततेमध्ये असलेले देवगड अशांत बनले आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण सल्लागार समितीची बैठक सोमवार ३ वाजता नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली होती. याचवेळी शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख गणेश गावकर, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, तालुकाप्रमुख जयेश नर, संतोष दळवी, हर्षा ठाकुर, काँग्रेसचे तालुकाप्रमुख उमेश कुळकर्णी, उल्हास मणचेकर व महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालय देवगडमध्ये या समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व देवगड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांना समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी आले होते.

ग्रामीण रुग्णालयातच वादावादी

ग्रामीण रुग्णालयामधील रुग्ण सल्लागार समितीची बैठक संपवून आमदार नितेश राणे बाहेर येत असतानाच त्यांच्यासोबत भाजपा कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. यावेळी उबाठा सेनेच्या व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आमदार नितेश राणे यांच्यासमोरच शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर मारामारीतही झाले. दोन पक्षांमध्ये झालेल्या या वादावादीमुळे ग्रामीण रुग्णालयातील वातावरण तणावाचे झाले होते.

मी विरोधी पक्षाचाही आमदार, प्रश्न विचारा

आमदार नितेश राणे म्हणाले, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असले तरीदेखील मी त्यांचा आमदार आहे. काय प्रश्न असतील तर ते मला सांगा मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरती धावून जात होते. पोलिसांसमोर या झालेल्या प्रकारामुळे शांतमय असलेले देवगड अशांततामय झाले आहे.

राजकीय मारामारी करून प्रश्न सुटणार काय?

गेली काही दिवस देवगड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत शिवसेना उबाठा सेनेच्यावतीने निवेदन देण्याचे व जाब विचारण्याचे प्रकार चालू होते. याचे अखेर पडसाद भाजपा व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्यामुळे देवगड तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये रुग्णालयातील समस्या सोडविण्याबाबत राजकीय लोकप्रतिनिधींनी केलेल्या कृत्याबाबत नाराजी होती. मारामारी करून रुग्ण समस्या सोडविल्या जातील का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Web Title: Thackeray Sena-BJP activists clashed in Devgarh, the incident took place in the presence of MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.