शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वाया जात असल्याने निशाण तलावाची तात्पुरती दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:13 IST

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील निशाण तलावावरील गोडबोले गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तलावातील पाणी वाया जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच ...

ठळक मुद्देनिशाण तलावाची तात्पुरती दुरुस्तीपाणी वाया जात असल्याने दुरुस्ती

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील निशाण तलावावरील गोडबोले गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तलावातील पाणी वाया जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच वेंगुर्ला नगरपरिषदेने याची दखल घेत गेटमधील बिघाड तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्त केला आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केल्याने तलावातील पाणी वाहून जाण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे.वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कॅम्प-वडखोल येथील निशाण तलावाचे गोडबोले गेट दरवर्षी १५ आॅगस्ट रोजी बंद करण्यात येते. मात्र, यावर्षी १५ आॅगस्ट उलटून गेल्यानंतर १० ते १५ दिवस होऊनही हे गेट बंद न करण्यात आल्याने येथील पाणी वाया जाऊन तलावातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.परिणामी, एप्रिल-मे ऐवजी फेब्रुवारी-मार्चमध्येच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. त्यातच नगरपरिषदेने गेट बंद करताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने हे गेट व्यवस्थित न बसल्याने पाणी वाहून जात आहे, अशाप्रकारचे वृत्त प्रसिद्ध होताच याची दखल घेत बुधवार २८ आॅगस्ट रोजी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. त्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात घट झालेली आहे.दरम्यान, याबाबत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व गोडबोले गेटच्या तंत्रज्ञांशी संपर्क केला असून संयुक्तरित्या पाहणी करण्यासाठी पत्र नगरपरिषदेकडून पाठविण्यात आले आहे. तरी तज्ज्ञांच्या पाहणीनंतर यावर कायमस्वरुपी उपाययोजना अवलंबली जाणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :WaterपाणीVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग