शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तार वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी केला हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:21 IST

Crimenews Kudal Police Sindhurug : कोकण रेल्वे विद्युतीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तारांची चोरी उघड झाल्यानंतर कुडाळ पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. या तपासामध्ये रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणावर चोरीची तार आढळली असून ही तार वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ठळक मुद्देतार वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी केला हस्तगत चोरीचा छडा : कोकण रेल्वे विद्युतीकरणासाठी वापर

कुडाळ : कोकण रेल्वे विद्युतीकरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तारांची चोरी उघड झाल्यानंतर कुडाळ पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. या तपासामध्ये रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणावर चोरीची तार आढळली असून ही तार वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी हस्तगत केला आहे.कुडाळ रेल्वेस्थानक येथील रेल्वेच्या मालकीच्या गोदामात असलेली कोकण रेल्वे विद्युतीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारी तार सुपरवायझर सुशीलकुमार दास याने आपल्या रत्नागिरी येथील साथीदाराच्या सहकार्याने चोरली. ती तार रत्नागिरी येथील भंगारवाला मलिक याला विक्री केली होती. ही चोरी उघड झाल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या आरोपींना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरीचा तपास पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्यासोबत पोलीस नाईक स्वप्निल तांबे, शशी प्रभू व सुबोध मळगावकर हे करीत आहेत.दरम्यान रविवारी कुडाळ पोलीस ठाण्याचे हे पथक तपासासाठी रत्नागिरी येथे भंगारवाला मलिक याला घेऊन गेले होते. कुडाळवरून चोरलेली एल अँड टी कंपनीची तार या भंगारवाल्याने दाखविली. ही तार पोलिसांनी ताब्यात घेतली. तसेच कुडाळवरून रत्नागिरीपर्यंत या तारेची वाहतूक करणारा टेम्पोसुद्धा ताब्यात घेऊन हस्तगत केला आहे. याप्रकरणी या तारेची वाहतूक करणारा टेम्पो चालक याच्यावर गुन्हा दाखल होणार की तो साक्षीदार म्हणून असणार आहे हे तपासात पुढे येणार आहे.तपास होणारया प्रकरणात एकूण किती किमतीची तार चोरण्यात आली आहे हे अद्याप उघड झालेले नाही. ते सोमवारी उघड होईल. तसेच या प्रकरणात अजून कोण आरोपी आहेत का याचाही तपास होणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गkudal police stationकुडाळ पोलिस स्टेशन