शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

खारेपाटणमध्ये गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पकडला, एकूण ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 18, 2024 14:01 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई

संतोष पाटणकर खारेपाटण : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्या देशात सर्वत्र आचारसंहिता जाहीर झालेली असतानाच मुंबई - गोवा राष्ट्रीय महार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे मधून गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. यामध्ये सुमारे २८ लाख ८८ हजार ४०० रुपये किमतीचे मद्य व ३५ लाख रुपये किमतीची वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज सोमवारी पहाटे ६.३० वाजता राज्य उत्पादन शुल्क व एस एस टी पथकाने व खारेपाटण पोलीस यांच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.याबाबत माहिती अशी की, टेम्पो चालक दिनेश रमेश व्यास (वय-३९, रा. विरार) हा आपल्या मालकीचा टेम्पो क्रमांक (एम एच -४८ बी एम ९६९१) घेवून गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता. खारेपाटण चेकपोस्ट येथील तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचारी उद्धव साबळे यांनी वाहन चालकांचा संशय आल्याने गाडी तपासासाठी थांबविली असता वाहनात बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू आढळून आली. याबाबत तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग व कणकवली पोलीस यांना माहिती देण्यात आली. यावेळी कणकवली पोलीस उपनिरीक्षक शरद देठे व राज्य उत्पादन शुल्क कणकवली निरीक्षक एन एल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. यावेळी एस एस टी खारेपाटण पथक प्रमुख आर एल शिंदे, कनिष्ठ अभियंता बापू कुंडलिक कुचेकर, एस वी दळवी, वैभव नामदेव घाडगे, खारेपाटण पोलीस नाईक उद्धव साबळे, एस एन कुवेसकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.वाहन चालक दिनेश व्यास याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास खारेपाटण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग करीत आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस