तेली, कुडाळकर राष्ट्रवादीत

By Admin | Updated: September 15, 2014 23:14 IST2014-09-15T22:54:05+5:302014-09-15T23:14:23+5:30

मुंबईत प्रवेश : जिल्ह्यातील राजकारणात होणार फेरबदल

Teli, Kudalkar NCP | तेली, कुडाळकर राष्ट्रवादीत

तेली, कुडाळकर राष्ट्रवादीत

सावंतवाडी : एकेकाळचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक तथा काँॅग्रेसचे माजी आमदार राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज, सोमवारी मुंबईतील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँॅग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत काँॅग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, सावंतवाडी माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज नाईक यांनीही प्रवेश केला. यामुळे जिल्ह्यात नारायण राणे यांना हा धक्काच मानला जात असून, यामुळे विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारणात मोठे फेरबदल होणार आहे.
माजी आमदार राजन तेली गेले दोन महिने काँॅग्रेसपासून अलिप्त होते. ते कोणत्या पक्षात जाणार, याची जिल्हावासीयांना उत्सुकता होती. त्यातच राजन तेली यांनी सावंतवाडीतून विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते; मात्र कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार, याची वाच्यता ते करीत नव्हते. राज्यात आघाडीमधील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिल्याने ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा तर्क लढविला जात होता. आगामी काळात माझ्या कार्यकर्त्यांचा गट राष्ट्रवादीमध्ये येईल, असे तेली यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

काँग्रेसचे माजी आमदार राजन तेली यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी डावीकडून छगन भुजबळ, सुनील तटकरे, मधुकर पिचड उपस्थित होते.

Web Title: Teli, Kudalkar NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.