शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone Updates: 'तौक्ते' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री पालकमंत्री उदय सामंत पोलीस ठाण्यात पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 05:10 IST

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री वेगुर्लेत, मध्यरात्री पोलीसांकडून आढावा  

ठळक मुद्दे‘तौत्के’ चक्रीवादळाचा शनिवारी सकाळी ताशी ७ किमी होता. त्यानंतर दुपारी ते ताशी १३ किमी वेगाने पुढे सरकत आहेरविवारी व सोमवारी या दोन्ही दिवशी हे चक्रीवादळ समुद्रातच अति वेगवान होत गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे. हे चक्रीवादळ गुजरातमधून पुढे राजस्थान व पाकिस्तानपर्यंत वाटचाल करणार असल्याचा अंदाज

सिंधुदुर्ग:  तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वेगुर्ले पोलीस ठाण्याला भेट देऊन सद्य:स्थितीची माहिती घेतली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री सामंत यांनी वेगुर्ले समुद्र किनारी पोलीसांकडून कशा प्रकारे तयारी सुरू आहे तसेच अतिरिक्त पोलीस कुमक कशा प्रकारे ठेवण्यात आली नुकसान होऊ नये यासाठी काय उपाय योजना करण्यात आल्या यांचा आढावा यावेळी घेत पोलिसाना सुचना केल्या आहेत.

‘तौत्के’ चक्रीवादळाचा शनिवारी सकाळी ताशी ७ किमी होता. त्यानंतर दुपारी ते ताशी १३ किमी वेगाने पुढे सरकत आहे. तेव्हा ते पणजीपासून २५० किमी, मुंबईपासून ६२०, गुजरातमधील वेरावळपासून ८५० किमी दूर होते. शनिवारी सायंकाळी चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले असून वार्‍याचा वेग ताशी ९५ ते १०५ किमीवर पोहचला आहे. उद्या रविवारी सायंकाळी या चक्रीवादळाचे अति तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. यावेळी त्याच्या वार्‍याचा वेग ताशी १२५ ते १४५ किमीपर्यंत पोहचणार आहे. रविवारी व सोमवारी या दोन्ही दिवशी हे चक्रीवादळ समुद्रातच अति वेगवान होत गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे. त्यानंतर १८ मे रोजी सकाळी अथवा दुपारी ते गुजरातमधील पोरबंदर आणि नालिया दरम्यान जमिनीवर धडकणार आहे. जमिनीवर धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होत जाणार असून १९ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत त्याचा परिणाम जाणवत राहणार असून हे चक्रीवादळ गुजरातमधून पुढे राजस्थान व पाकिस्तानपर्यंत वाटचाल करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळUday Samantउदय सामंत