शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फोंडाघाटात इंधन वाहतूक करणारा टँकर पेटला; एकाचा होरपळून मृत्यू 

By सुधीर राणे | Updated: December 5, 2024 11:55 IST

कणकवली : सांगली-मिरज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधन घेवून येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर  फोंडाघाटात दिंडी पासून दीड किलोमीटर अंतरावर ...

कणकवली : सांगली-मिरज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधन घेवून येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर  फोंडाघाटात दिंडी पासून दीड किलोमीटर अंतरावर पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. त्यातील इंधनाला आग लागून भडका उडाला. या घटनेत  एक व्यक्ती आगीच्या ज्वाळामुळे होरपळल्याने मृत्युमुखी पडली आहे. ही घटना बुधवारी घडली. मृताचे नाव समजू शकले नाही.फोंडाघाटात अवघड वळणावर अचानक चालकाचा ताबा सुटल्‍याने टँकर पलटी झाला. त्‍यानंतर टँकरमधील इंधनाने लगेच पेट घेतला. त्‍यामुळे सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून फोंडाघाटातील वाहतूक ठप्प झाली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली,कुडाळ येथून अग्निशमन बंब मागविण्यात आले होते. या घटनेची माहिती समजताच अपघातस्थळी कणकवली पोलिस रवाना झाले. फोंडाघाट येथील स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशी यांनीसुद्धा ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. कणकवली पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती जगताप,उपनिरीक्षक अनिल हाडळ,राजकुमार मुंढे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच या अपघातात कोण जखमी आहेत काय ? अजून कोण भाजले आहेत काय याची शहानिशा रात्री उशिरापर्यंत  केली जात होती.तसेच एका व्यक्तीचा आगीत होरपळलेल्या स्थितीत मृतदेह मिळाला असून तो कोणाचा आहे? याबाबतही शोध घेण्यात येत होता. त्याबाबत अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान,यापूर्वी याच तीव्र वळणावर फरशीचा एक ट्रक असाच कोसळला होता. त्यावेळीही वाहतूक कोंडी झाली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरfireआग