तालुकास्तरीय स्पर्धेत तळेरे शाळेला चॅम्पियनशिप

By Admin | Updated: January 12, 2015 21:47 IST2015-01-12T21:42:54+5:302015-01-12T21:47:17+5:30

हरकुळ बुद्रुक येथे बक्षीस वितरण : ‘बाल कला, क्रीडा, ज्ञानी मी होणार’ उत्साहात

Tallere Championship championship in taluka level competition | तालुकास्तरीय स्पर्धेत तळेरे शाळेला चॅम्पियनशिप

तालुकास्तरीय स्पर्धेत तळेरे शाळेला चॅम्पियनशिप

कनेडी : कणकवली तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धा ल. गो. सामंत माध्यमिक विद्यालय हरकुळ बुद्रुक येथे पार पडली. या स्पर्धेत तळेरे शाळेने चॅम्पियनशिपचा किताब पटकावला.स्पर्धांचा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकानुसार पुढीलप्रमाणे- मोठा गट- १०० मीटर धावणे- मुले- ओंकार पाष्टे (शिडवणे नं. १ तळेरे प्रभाग), धनराज जाधव (नागवे नं. १ कनेडी प्रभाग), २०० मीटर धावणे- मुले- सिद्धेश कांबळी (शिडवणे नं. १ तळेरे विभाग), यश जाधव (वारगाव नं. १ तळेरे विभाग), लांब उडी- ओंकार पाष्टे (शिडवणे नं. १ तळेरे प्रभाग), सर्वेश कदम (कुर्ली वसाहत फोंडा), उंचउडी- केतन परब (हळवल नं. १ कणकवली), सर्वेश कदम (कुर्ली वसाहत फोंडा), गोळाफेक- विराप्पा पुजारे (जानवली मारुती हुंबरठ), ऋतिक कुडाळकर (तळेरे), रिले ४ बाय १०० मीटर- वागदे नं. १ कणकवली, कबड्डी- कुरंगावणे खैराट तळेरे, खो-खो- शिडवणे नं. १ तळेरे. ज्ञानी मी होणार- कणकवली नं. ३, समूहगान- कणकवली नं. ३, समूह नृत्य- कणकवली नं. ३.
मोठा गट मुली- १०० मीटर धावणे- प्रिया सावंत (सांगवे गावकर कनेडी), रूपाली लाड (दिगवळे बामणदे कनेडी), २०० मीटर धावणे- पल्लवी मांडवकर (लोरे नं. १, फोंडा), सरिता केतकर (शिडवणे नं. १, तळेरे), लांब उडी- सरिता केतकर (शिडवणे नं. १, तळेरे), वैष्णवी शिरोडकर (सावडाव खडांजी हुंबरठ), उंचउडी- प्रिया सावंत (सांगवे गावकर कनेडी), सुवर्णा जाधव (वारगाव नं. १, तळेरे), गोळाफेक- प्रियांका मेस्त्री (आशिये, कणकवली), तुळशी गावकर (कसवण नं. २ कणकवली), ४ बाय १०० मीटर रिले- शिडवणे नं. १ (तळेरे).
लहान गट मुले- ५० मीटर धावणे- दीपक कदम (तरंदळे नं. १ हुंबरठ), सदानंद नामये (साळिस्ते तळेरे), १०० मीटर धावणे- मुकुंद अपराज (वरवडे नं. १ हुंबरठ), नीतेश येंडे (बोर्डवे नं. ३ कणकवली), लांबउडी- विठोबा हळदणकर (दिगवळे बामणदे कनेडी), अब्दुल्ला मीर (हरकुळ बुद्रुक कनेडी), उंचउडी- सदानंद नामये (वारगाव नं. ३ तळेरे), सूरज परब (ओसरगाव नं. १ कणकवली), ४ बाय ५० मीटर रिले- बोर्डवे आश्रमशाळा, हरकुळ बुद्रुक, कबड्डी- सांगवे गावकर, कुरंगावणे खैराट, खो-खो- शिडवणे नं. १, लोरे नं. १, ज्ञानी मी होणार- हळवल नं. ३, तोंडवली बोभाटे, समूहगान- खारेपाटण रामेश्वरनगर, हळवल नं. ३, समूह नृत्य- खारेपाटण नं. १, जानवली मारुती.
लहान गट मुली- ५० मीटर धावणे- पूर्वा तेली (बोर्डवे नं. १), आर्ची मोरये (नांदगाव नं. १), १०० मीटर धावणे- प्रीती भोगले (पिसेकामते गावठण), पूर्वा रासम (हरकुळ खुर्द नं. १), लांब उडी- प्रीती धावडे (वारगाव नं. ३), अनुजा जाधव (पिसेकामते), उंचउडी- गीता येडगे (फोंडा गांगोवाडी), लतिका वारंग (कळसुली हुंबरणे), ४ बाय ५० मीटर रिले- पिसेकामते गावठण, हरकुळ बुद्रुक उर्दू, कबड्डी- हरकुळ खुर्द मोहूळ, बोर्डवे आश्रम, खो-खो- कुर्ली वसाहत, जानवली मारुती. विजेत्यांना बक्षीस वितरण पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती बाबासाहेब वर्देकर, पंचायत समिती सदस्या श्रीया सावंत, माजी उपसभापती बुलंद पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, सरपंच आनंद ठाकूर, उपसरपंच राजू पेडणेकर, गटशिक्षणाधिकारी अनिल कांबळे, सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी, आदी उपस्थित होते. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. विजय भोगले यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Tallere Championship championship in taluka level competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.