जिओ कंपनीकडून भरपाई घ्या, मालवण नगरपालिका सभेत मागणी
By Admin | Updated: March 18, 2017 16:46 IST2017-03-18T16:46:21+5:302017-03-18T16:46:21+5:30
नगरसेवक खोत आक्रमक, फौजदारीची मागणी

जिओ कंपनीकडून भरपाई घ्या, मालवण नगरपालिका सभेत मागणी
आॅनलाईन लोकमत
मालवण : जिओ केबलच्या प्रश्नावरुन नगरसेवक यतीन खोत मालवण नगरपालिका सभेत आक्रमक झाले. रस्ता खोदाईनंतर झालेली नुकसान भरपाई जिओ कंपनीकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
यतीन खोत यांच्या मागणीला सुदेश आचरेकर, मंदार केणी यांनी साध दिली. रात्रीच्या वेळी रस्ता खोदाई करुन लाईन टाकणे म्हणजे ही चोरीच आहे, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही या सदस्यांनी केली आहे. रात्रीचे काम म्हणजे सर्वांच्या संगनमताने काम केल्याचा आरोप मंदार केणी यांनी केला आहे. जिओ कंपनीवर प्रशासनाने कारवाई करावी, प्रशासनाला कारवाई करणे जमत नसेल तर अध्यक्षांनी प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणीही केणी यांनी केली आहे.
कोणीही यावे, आणि टिचकी मारुन जावे, असे प्रसानाचे काम आहे, अशी टीका नितीन वाळके यांनी केली आहे. रस्त्याचे नुकसान केल्याप्रकरणी प्रशासनाने जिओ कंपनीला ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचा खुलासा केला असला तरी हे नुकसान लाखो रुपयांचे झाले असल्याची टीका या नगरसेवकांनी केली आहे.