शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न करून  तत्काळ उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करु - राष्ट्रवादी काँग्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 21:44 IST

कणकवली तालुक्यात लेप्टोचे  रुग्ण आढळत असून आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न करून  तत्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा  कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सि.एम.शिकलगार यांना देण्यात आला.

कणकवली : कणकवली तालुक्यात लेप्टोचे  रुग्ण आढळत असून आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा सुधारण्याचा प्रयत्न करून  तत्काळ उपाययोजना कराव्यात. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा  कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सि.एम.शिकलगार यांना देण्यात आला.     येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी धडक दिली. तसेच लेप्टो बाबत तातडिने उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली.     यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजेश पाताड़े , प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुभाष सावंत,  तालुकाध्यक्ष विलास गावकर,  दिलीप वर्णे, दत्ता कल्याणकर, अनीस नाईक, विशाल पेडणेकर, निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले, इम्रान शेख, मनोहर मालंडकर, रविकांत सावंत आदी उपस्थित होते.        रुग्णांची हेळसांड होत असल्याने राष्ट्रवादीच्या वतीने डॉक्टरांना जाब विचारण्यात आला. मागील ३ वर्षांत जिल्ह्याच्या आरोग्याचे  तीन तेरा वाजले आहेत. जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे आरोग्यमंत्री असतानाही त्यांचे स्वतःच्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत आहे.      काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात तापसरी असताना कणकवली रुग्णालयात रोटेशन नुसार महिनाभर फिजिशियन उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, युती काळात केवळ ६ दिवसांसाठी  फिजिशियन दिला आहे.      जिल्ह्यातील रुग्णांच्या मरणाला हे सरकार तहानलेले आहे का असा सवाल अबिद नाईक यांनी यावेळी विचारला.      तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात प्लेटलेट बॅग ठेवाव्यात अशी  मागणीही त्यांनी यावेळी केली.  रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा न पुरविल्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या मार्फत हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यात येईल असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला.  तसेच मागण्यांचे निवेदन डॉ.शिकलगार यांना दिले. दरम्यान, या मागण्यांच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग