कुडाळ : व्हाट्सअपच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाची बदनामी करणाऱ्या संबंधित युवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुडाळ राष्ट्रवादीच्यावतीने सोमवारी पोलिसांकडे करण्यात आली आहे.याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात असलेला एक व्हिडिओ काही युवकांकडून प्रसारित करण्यात आला आहे. यात कुडाळातील एका युवकाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे यात म्हटले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळा कनयाळकर, भास्कर परब, साबा पाटकर, आत्माराम ओटवणेकर, कृष्णा बिबवणेकर, राजन वराडकर, आनंद आकेरकर अन्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:13 IST
व्हाट्सअपच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाची बदनामी करणाऱ्या संबंधित युवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुडाळ राष्ट्रवादीच्यावतीने सोमवारी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा
ठळक मुद्देराष्ट्रवादीची बदनामी करणाऱ्यावर कारवाई कराव्हिडिओ काही युवकांकडून प्रसारित