प्रतिकात्मक पुतळा कणकवलीत जाळला
By Admin | Updated: July 20, 2014 22:11 IST2014-07-20T22:10:39+5:302014-07-20T22:11:33+5:30
शिवसेना महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर यांनी टीका केली होती.

प्रतिकात्मक पुतळा कणकवलीत जाळला
कणकवली : उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर यांनी टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या काँगे्रस महिला आघाडीच्यावतीने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन येथील बसस्थानकासमोरील महामार्गावर करण्यात आले.
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या राजीनामा देण्यावरून महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप रंगले आहेत. यातूनच एकमेकांवर टीकाही केली जात आहे. शिवसेनेच्या महिला आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. यामुळे काँग्रेस महिला आघाडीच्या सदस्या संतप्त झाल्या. त्यांनी पेडणेकर यांचा निषेध केला. तसेच रविवारी दुपारी येथील काँगे्रस कार्यालयासमोरील महामार्गावर किशोरी पेडणेकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याला जोडे मारण्याबरोबरच त्याचे दहनही केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रज्ञा ढवण, महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रणिता पाताडे, शहराध्यक्षा मेघा गांगण, नगरसेविका सुमेधा अंधारी, शर्वरी पाटकर, वंदना खटावकर आदी महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या. (वार्ताहर)