शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पडळकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला, कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 19:05 IST

राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारीत तो जाळला. तसेच त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. हे आंदोलन करणाºया १६ जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देपडळकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला, कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध आंदोलन करणारे १६ जण पोलिसांच्या ताब्यात

कुडाळ : राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारीत तो जाळला. तसेच त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. हे आंदोलन करणाºया १६ जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.शरद पवार म्हणजे देशाला लागलेला कोरोना असे वक्तव्य भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर राज्यात सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी पक्षाकडून निषेध केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सकाळी कुडाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालय ते हॉटेल आरएसएन येथील महामार्गापर्यंत पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच जोडो मारो आंदोलन छेडत पुतळा जाळून त्यांच्या वक्तत्वाचा जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपजिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, तालुकाध्यक्ष भास्कर परब, कुडाळ शहराध्यक्ष संग्राम सावंत, सोशल मीडिया प्रमुख सचिन पाटकर, युवक शहर अध्यक्ष हेमंत कांदे, कुडाळ तालुका अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष नजीर शेख, अल्पसंख्याक कुडाळ शहर अध्यक्ष हमीद शेख, बाळ कनयाळकर, साबा पाटकर, कादर खान, बशीर खान, शिराज शहा, इब्राहिम शहा या सर्वांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत कुडाळ पोलीस ठाण्यात आणले.यावेळी अमित सामंत यांनी सांगितले की, आमचे नेते शरद पवार यांच्यावर बोलण्याची पडळकरांची लायकी नाही. शरद पवार यांची लोकनेता म्हणून ओळख आहे. अशा नेत्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचे म्हणाले.त्यांनी योग्यता तपासावीएकही निवडणूक न जिंकलेल्या पडळकर यांनी आपले राजकीय वय आणि योग्यता तपासून पहावी. शरद पवार हे जेवढी वर्षे राजकारणात आहेत तेवढे पडळकर यांचे वयदेखील नाही. त्यामुळे पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर बोलताना कोणाविरुद्ध बोलतो याचे भान ठेवावे व पडळकर त्यांनी आपल्या गल्लीपुरते राजकारण करावे, असा टोलाही लगावला. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरsindhudurgसिंधुदुर्गNCPराष्ट्रवादी काँग्रेस