शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात स्वाभिमानकडून स्वच्छता, श्रमदानातून मोहीम, ग्रामीण रुग्णालय परिसरातील झाडीझुडपे तोडून साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 18:04 IST

मालवण ग्रामीण रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडीझुडपे वाढल्याने अनेकदा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने सकाळी शवविच्छेदनगृह परिसरात वाढलेली झाडीझुडपे तोडून श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देग्रामीण रुग्णालय परिसरातील झाडीझुडपे तोडून साफसफाईमालवण ग्रामीण रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह परिसरात स्वच्छता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मोहीम

मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडीझुडपे वाढल्याने अनेकदा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने सकाळी शवविच्छेदनगृह परिसरात वाढलेली झाडीझुडपे तोडून श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत शहरातील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. साफसफाई दरम्यान एक ट्रॅक्टर भरून प्लास्टिक कचरा तर पाच ते सहा ट्रॅक्टर अन्य झाडीझुडपांच्या स्वरुपातील कचरा जमा झाला. मालवण शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा शवविच्छेदनगृहाच्या शेजारचा परिसर मोठ्या प्रमाणावर झाडीझुडपांनी वेढलेला होता.त्याचप्रमाणे याठिकाणी प्लास्टिक कचऱ्याचाही खच साठला होता. यामुळे तालुक्यातील शवविच्छेदनासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याठिकाणी मृतदेहासाठी आणण्यात येणारी रुग्णवाहिका उभी करण्यासाठी झाडीझुडपांमुळे जागा शिल्लक राहिली नव्हती.

रात्री-अपरात्री शवविच्छेदनासाठी येणाऱ्या नागरिकांना तर या परिसरापासून दूर रस्त्यावर उभे रहावे लागत असे. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदनगृह परिसर झाडीझुडपे आणि कचरामुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी शवविच्छेदनगृह परिसरात जमत स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.

यावेळी तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक यतीन खोत, नगरसेवक दीपक पाटकर, ममता वराडकर, दीपाली वायंगणकर, विलास मुणगेकर, चारुशीला आचरेकर, आबा हडकर, मनोज मयेकर, महेश मयेकर, अभय कदम, सदा चुरी, दिलीप वायंगणकर, समिक्षा चव्हाण, महेश गिरकर, महेश हडकर, उत्तम पेडणेकर, तळाशिलकर यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान